नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:40 PM2018-06-20T23:40:22+5:302018-06-20T23:40:22+5:30

वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे.

Raped on twin sisters in Nagpur | नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार

नागपुरात  जुळ्या बहिणींवर अत्याचार

Next
ठळक मुद्देघरमालकाचे कृत्य : वर्धमाननगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे.
पीडित मुलींचे आई-वडील चव्हाण याच्या घरी किरायाने राहतात. त्या दोघीही नऊ वर्षांच्या आहे. वडील पेंटिंगचे काम करतात. तर आई आठवड्याभरापासून एका दुकानात कामाला जाते. या दोघींबरोबर या दाम्पत्याला तिसरी पाच वर्षाची मुलगी आहे. शाळेला सुट्या असल्याने पीडित मुली व त्यांची पाच वर्षांची लहान बहीण घरीच राहते. आरोपी चव्हाण हा इलेक्ट्रिक फिटींगचे काम करतो. त्याला काम नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून तो घरीच राहतो. चव्हाण याची पत्नी व पीडित मुलींचे आई-वडील कामावर गेल्यानंतर तो मुलींवर अत्याचार करीत होता. त्याने मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी चव्हाणचे कृत्य लहान बहिणीच्या नजरेत आले. तिने आईला घरी आल्यानंतर सांगितले. पीडितेच्या आईने हा प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितला. नवऱ्याच्या अशा कृत्याची पोलिसात तक्रार करण्यासाठी आरोपीच्या पत्नीनेही समर्थन दिले. मंगळवारी मुलींचे आई-वडील लकडगंज ठाण्यात पोहचले. दरम्यान आरोपी चव्हाण हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. आरोपीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
परिसरातील नागरिकांमध्ये संताप
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी चव्हाण याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. चव्हाण याला १४ वर्षांचा मुलगा व १७ वर्षांची मुलगी आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे.

Web Title: Raped on twin sisters in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.