शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:01 AM2019-09-18T00:01:31+5:302019-09-18T00:04:22+5:30

निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा एका शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Rapist director of education institute absconding | शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार

शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार

Next
ठळक मुद्देपीडित मुलीच्या आईलाही पळविल्याचा संशयअटकपूर्व जामिन मिळविण्याचा प्रयत्नपोलिसांची ठिकठिकाणी शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा एका शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो फरार राहून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने पीडित मुलीच्या आरोपी आईलाही फरार केले आहे. या दोघांचा पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
पीडित मुलगी (वय १७) मुळची शिवनी येथील रहिवासी आहे. तिची आई १३ वर्षांपासून आरोपी अशोक जयस्वालकडे काम करते आणि त्याच्या शेतातील आउट हाऊसमध्ये राहते. मुलीचे वडिल काही वर्षांपासून मध्यप्रदेशात मुळगावी राहतात. पीडित मुलीने १० पास केल्यानंतर तिच्या आईने तिला शिकवण्याऐवजी कामात गुंतवले. तिला आणखी एक बहिण (वय १५) आणि मोठा भाऊ (वय २०) आहे. आरोपी जयस्वालने महिलेच्या निराधारपणाचा गैरफायदा उचलून तिच्या लहानसहान गरजा पूर्ण केल्या. नराधम जयस्वालची नजर पीडित मुलीवर तीन वर्षांपूर्वी पडली. त्याने आॅक्टोबर २०१६ पासून तिला वारंवार जवळ बोलवणे सुरू केले. त्यानंतर तो तिला बाहेगावी घेऊन जाऊ लागला. तिच्या आईची संमती घेऊन त्याने तिला हैदराबाद तसेच मुंबईला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून बलात्कार केला. त्यानंतर तो नेहमीच पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. तिच्या आईची मूक संमती असल्यामुळे नराधम जयस्वाल निर्ढावला होता. आपल्या मुलीच्या वयाच्या गरिब मुलीसोबत तो तोंड काळे करीत होता.
दरम्यान, जून महिन्यात पीडित मुलीच्या लहान बहिणीला भंडाऱ्याच्या एका आरोपीने पळवून नेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीला भंडाºयावरून ताब्यात घेतले. पळवून नेलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तिच्याकडे गेले होते. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यामुळे नराधम जयस्वालच्या पापाचा खुलासा झाला. त्यानंतर प्रकरण नंदनवन ठाण्यात पोहचले.
पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नराधम जयस्वाल आणि त्याला मदत करणारी मुलीची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला. ते कळताच आरोपी जयस्वाल फरार झाला. त्याने स्वत: फरार होतानाच पीडित मुलीच्या आईलाही फरार केले. त्यानेच तिला पळवून नेले असावे, असा संशय आहे. तो आता अटकपूर्व जामिन मिळवण्याचे प्रयत्न करीत आहे. तर, त्याचा आणि महिला आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके मध्यप्रदेशसह ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
समाजमन संतप्त !
आरोपी जयस्वाल स्वामी नारायण मंदीराजवळ राहतो. त्याची शिक्षण संस्था असून, तो काही कत्राटदारीही करतो. स्वनामधन्य नेता म्हणूनही तो मिरवतो. तो यापूर्वी सामाजिक संघटनेचा अध्यक्षही होता. आपले पाप घरच्यांना माहिती पडू नये म्हणून त्याने पीडित मुलीचे कुटुंबं शेतातील आउट हाऊसमध्ये ठेवले होते. पीडित मुलीला त्याने हैदराबादला झोपेची गोळी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला मुंबईला नेले होते. तिचे शोषण चालविल्यानंतर त्याची विकृत नजर मुलीच्या लहान बहिणीवर (वय १५) गेली. तो तिला कार्यालयात कुणी बोलावून घ्यायचा अन् तेथे तिच्याशी अश्लिल चाळे करायचा. त्याने पीडितेच्या आईला आणि नंतर दोन्ही मुलींना बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. जयस्वालच्या पापाचा बोभाटा झाल्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Rapist director of education institute absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.