पीडित मुलीचे वय सिद्ध न झाल्याने बलात्कारी सुटला निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:08 PM2018-05-21T12:08:40+5:302018-05-21T12:13:18+5:30

पहिल्यांदा शारीरिक सहवास झाला त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती हे एका बलात्कार प्रकरणामध्ये सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.

Rapist free, age of minor girl is not proved | पीडित मुलीचे वय सिद्ध न झाल्याने बलात्कारी सुटला निर्दोष

पीडित मुलीचे वय सिद्ध न झाल्याने बलात्कारी सुटला निर्दोष

googlenewsNext
ठळक मुद्देसत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्यांदा शारीरिक सहवास झाला त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती हे एका बलात्कार प्रकरणामध्ये सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.
किशोर ऊर्फ बंडू हरदोजी निमगडे (२३) असे आरोपीचे नाव असून तो एटापल्ली येथील रहिवासी आहे. आरोपी व तक्रारकर्ती मुलगी दोघेही शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांच्यात प्रेम फुलले. ते रोज भेटायला लागले. एकमेकांना प्रेमपत्र द्यायला लागले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मुलीसोबत वारंवार शारीरिक सहवास केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर झाले. आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

Web Title: Rapist free, age of minor girl is not proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.