नागपुरात दुर्मिळ वटवाघुळाचा वाचविला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:06 PM2018-09-10T15:06:50+5:302018-09-10T15:09:35+5:30

दुर्मिळ वटवाघुळ (फ्रुट बॅट) झाडावरच्या नायलॉन मांजात अडकून जखमी झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे या पक्ष्यावर लक्ष गेले. त्यांनी झाडावरून पक्षी खाली आणून डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याने त्या वटवाघुळाचा जीव वाचला.

Rare fruit bat survived in Nagpur | नागपुरात दुर्मिळ वटवाघुळाचा वाचविला जीव

नागपुरात दुर्मिळ वटवाघुळाचा वाचविला जीव

googlenewsNext
ठळक मुद्देनायलॉन मांजात अडकला होता पक्षी सामाजिक कार्यकर्ते आले धावून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 
रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील एका झाडावर हे लुप्त होणारे वटवाघुळ नायलॉन मांजामध्ये गुंतून पडले होते. मांजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामुळे ते जखमीही झाले होते. सामाजिक कार्यकर्ता अमर काळे यांचे या पक्ष्याकडे लक्ष गेल्यावर किंग कोब्रा आॅर्गनायझेशन यूथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांना याची माहिती दिली. रतुडी यांनी कार्यकर्ता शुभम पराडेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. मांजात अडकलेल्या वटवाघुळाला बाहेर काढून उपचारासाठी प्राण्यांचे डॉक्टर मयूर काटे यांच्या धंतोली येथील दवाखान्यात घेऊन गेले. जखमी वटवाघुळाचा उजवा डोळा एका प्राण्याने जखमी केला. तसेच त्याच्या दोन्हीही पंखाची हाडे तुटली होती व शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. 
प्राथमिक उपचार करून त्यानंतर पशू निवारक केंद्रात (शेल्टर) प्राणीमित्र स्वप्निल बोधाने यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांची सतर्कता व डॉक्टरांनी ताबडतोब केलेल्या उपचारामुळे जखमी वटवाघुळाचा जीव वाचला. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

Web Title: Rare fruit bat survived in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.