सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मीळ हौबारा, वाळवंटात पक्षी सोडण्यासाठी राजस्थान सरकारच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 11:54 AM2022-11-13T11:54:24+5:302022-11-13T11:55:19+5:30

Sindhudurg News: संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथील एव्हीएन संशोधन केंद्राने चिन्हांकित केलेला दुर्मीळ हौबारा माळढोक हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरुवारी आढळला आहे.

Rare Houbara spotted in Sindhudurg, Rajasthan government in touch to release the bird in the desert | सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मीळ हौबारा, वाळवंटात पक्षी सोडण्यासाठी राजस्थान सरकारच्या संपर्कात

सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मीळ हौबारा, वाळवंटात पक्षी सोडण्यासाठी राजस्थान सरकारच्या संपर्कात

Next

- संजय रानडे
नागपूर : संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथील एव्हीएन संशोधन केंद्राने चिन्हांकित केलेला दुर्मीळ हौबारा माळढोक हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गुरुवारी आढळला आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने  यूएईशी केलेल्या संपर्कातून असे लक्षात आले आहे की, हा माळढोक काही महिन्यांपूर्वी प्रजननासाठी सोडण्यात आला होता. हे माळढोक सामान्यत: गुजरात आणि राजस्थानच्या वाळवंटी भागात पोहोचतात. त्यापैकी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरकटला आहे. ‘लोकमत’ला दुजोरा देताना बीएनएचएसचे सहायक संचालक सुजित नरवडे म्हणाले की, हौबारा माळढोक हे मूळचे उत्तर आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पातील आहेत. 

देवगड तहसीलच्या मुनागे गावात हा माळढोक सापडला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये नॅशनल एव्हियन रिसर्च सेंटरने प्रजननासाठी त्याला सोडले होते. बीएनएचएसच्या ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लोरिकन प्रकल्पाचे समन्वयक नरवाडे यांनी सांगितले की, हौबारा माळढोक हे प्रामुख्याने कोरड्या गवताळ प्रदेशात राहतात. हा तुलनेने लहान आहे. 

सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले की, हौबारा माळढोक निरोगी आहे, पण उडण्यास सक्षम नाही. पक्षी थकलेला असू शकतो आणि पुढील २ ते ३ दिवस तो आमच्या पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली असेल. 

नॅशनल एव्हियन रिसर्च सेंटर, संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबीने हौबारा माळढोकच्या दोन्ही पायात प्रत्येकी एक धातूची अंगठी आणि हिरव्या रंगाचा बँड घातलेला आहे. हौबारा माळढोक हा निस्तेज तपकिरी असून पंखांवर काळ्या खुणा असतात. मान राखाडी आणि मानेच्या बाजूला काळा पट्टा असतो. नर हे मादीपेक्षा मोठे आणि जड असतात. ही प्रजाती सर्वभक्षी आहे. बिया, कीटक आणि इतर लहान प्राणी खातो.

Web Title: Rare Houbara spotted in Sindhudurg, Rajasthan government in touch to release the bird in the desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.