दक्षिण भारतात आढळणारे दुर्मीळ कासव सापडले नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 08:55 PM2021-06-30T20:55:50+5:302021-06-30T20:58:13+5:30

Rare tortoise found साधारणत: दक्षिण भारतामध्ये आढळणारे दुर्मीळ कासव मंगळवारी रात्री नागपुरातील हिंगणा परिसरात आढळले. या कासवाची प्रथमच नागपुरात नोंद झाली असून, या प्रजातीची अन्य कासवे नागपूरलगतच्या जलाशयात असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

Rare tortoise found in South India found in Nagpur | दक्षिण भारतात आढळणारे दुर्मीळ कासव सापडले नागपुरात

दक्षिण भारतात आढळणारे दुर्मीळ कासव सापडले नागपुरात

Next
ठळक मुद्दे२२ किलो वजन, लांबी ८३ सेंटीमीटर : हिंगणा परिसरातून सुरक्षित पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : साधारणत: दक्षिण भारतामध्ये आढळणारे दुर्मीळ कासव मंगळवारी रात्री नागपुरातील हिंगणा परिसरात आढळले. या कासवाची प्रथमच नागपुरात नोंद झाली असून, या प्रजातीची अन्य कासवे नागपूरलगतच्या जलाशयात असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

हिंगणा येथील परिसरातील कॉलनीमधील रस्त्यावरून मंगळवारी रात्री एक भले मोठे कासव चालत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. येथील रहिवासी गजानन ढाकुलकर यांनी हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना ही माहिती दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून कासवाला ताब्यात घेतले आणि वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशू पर्यवेक्षक सिद्धांत मोरे यांनी तपासणी केली. यावेळी वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव उपस्थित होते. त्याचे स्वास्थ्य उत्तम असल्याचे तपासणीत आढळून आले असून, लवकरच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.

नागपुरात प्रथमच नोंद

या कासवाचे शास्त्रीय नाव लेइथ्स सॉफ्ट्‌सहेल टर्टल असे असून ते प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळते. याचे वजन २२ किलो २०० ग्रॅम असून, लांबी ८३ सेंमी व रुंदी ५१ सेंमी आहे. शरीराचा संपूर्ण घेर १६५ सेंमी एवढा आहे. या मोठ्या कासवाची प्रथमच नागपुरात नोंद झाली आहे.

Web Title: Rare tortoise found in South India found in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.