‘त्या’दूर्मिळ कासवाला सोडले गडचिरोलीच्या प्राणहितामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:44+5:302021-07-16T04:07:44+5:30
नागपूर : दक्षिण भारतातील नद्यांमध्ये आढळणाऱ्या लेइथ्स सॉफ्टसहेल प्रजातीच्या दुर्मिळ कासवाला अखेर गुरुवारी सायंकाळी वन विभागाने गडचिरोलीच्या प्राणहिता नदीमध्ये ...
नागपूर : दक्षिण भारतातील नद्यांमध्ये आढळणाऱ्या लेइथ्स सॉफ्टसहेल प्रजातीच्या दुर्मिळ कासवाला अखेर गुरुवारी सायंकाळी वन विभागाने गडचिरोलीच्या प्राणहिता नदीमध्ये सोडले. ही नदी पुढे गोदावरीला मिळते. प्राणितज्ज्ञांच्या मते, गोदावरी नदी ही लेइथ्स सॉफ्टसहेल प्रजातींच्या कासवांचे मुख्य अधिवास क्षेत्र आहे. यामुळे त्याला प्राणहितामध्ये सोडणे सुरक्षित मानले जात आहे.
काही वर्षापूर्वी राजस्थानात असलेल्या एका महाराष्ट्रीयन अभ्यासकाने या कासवावर विस्तृत अध्ययन केले होते. त्यांच्या वैज्ञानिक सल्ल्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून त्याला तिथे सुरक्षितपणे नेले. नंतर प्राणहिता नदीमध्ये मुक्त केले. ३० जूनला हा दुर्मिळ कासव हिंगणा येथील एका कॉलनीमध्ये रस्त्यावर फिरत असल्याचे नागरिकांना दिसले होते. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन देखरेखीखाली ठेवले होते.
...
१५ दिवसाचा मुक्काम
या कासवाचा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये १५ दिवस मुक्काम होता. त्याच्यासाठी येथे एक टँक तयार करण्यात आले होते. सोबतच त्याच्या अधिवासाची माहिती मिळविण्याचेही काम सुरू होते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट (डेहराडून) यांच्याकडूनही माहिती मिळविण्यात आली होती. योग्य माहिती मिळताच हा निर्णय घेण्यात आला. त्याला मूळ अधिवासात सोडण्याची जबाबदारी वन विभागाकडे सोपविण्यात आली होती.
...