राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांना धक्का

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 25, 2024 12:38 PM2024-06-25T12:38:01+5:302024-06-25T12:38:47+5:30

Nagpur : निलंबन कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

Rashtrasant Trukeji Maharaj Nagpur University Vice-Chancellor Dr. Subhash Chaidhari gets in trouble | राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांना धक्का

Rashtrasant Trukeji Maharaj Nagpur University Vice-Chancellor Dr. Subhash Chaidhari gets in trouble

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्याविरुद्धच्या निलंबन कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चाैधरी यांना जोरदार धक्का बसला.

चाैधरी यांनी विविध प्रकारची अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कुलपती रमेश बैस यांनी चौधरी यांना ८ मे २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर १३ जून रोजी दुसरी नोटीस बजावून प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या कारवाईविरुद्ध चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये चौधरी यांनी वादग्रस्त कारवाई अवैध असल्याचा दावा करून या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली होती. त्यावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता. तो निर्णय मंगळवारी जाहीर केला गेला.

Web Title: Rashtrasant Trukeji Maharaj Nagpur University Vice-Chancellor Dr. Subhash Chaidhari gets in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.