राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात ३,८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 01:12 AM2021-05-19T01:12:29+5:302021-05-19T01:13:33+5:30

Rashtriya Swayamsevak Sangh has set up helpline centers कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेमध्येदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशातील विविध भागात मदतकार्य सुरू आहे. देशभरात जवळपास ३ हजार ८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र चालविण्यात येत आहेत. तर २८७ शहरांमध्ये कोरोनाबाधितांसाठी ९,८०० खाटांचे आयसोलेशन केंद्र व ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्र सुरू असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh has set up helpline centers at 3,800 places across the country | राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात ३,८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात ३,८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देपावणेतीनशेहून अधिक शहरात आयसोलेशन सेंटर्स : ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेमध्येदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशातील विविध भागात मदतकार्य सुरू आहे. देशभरात जवळपास ३ हजार ८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र चालविण्यात येत आहेत. तर २८७ शहरांमध्ये कोरोनाबाधितांसाठी ९,८०० खाटांचे आयसोलेशन केंद्र व ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्र सुरू असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

संघासह सेवाभारतीच्या माध्यमातून कोरोनाप्रभावित कुटुंब व गरजूंना मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोबतच विविध शहरांमध्ये कोरोना केअर केंद्र, हेल्पलाईन केंद्र, सरकारी कोरोना केअर केंद्र व इस्पितळांमध्ये मदत उपलब्ध करून देणे, ऑनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, अंत्यसंस्कार, ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण जागरूकता इत्यादी उपक्रम सुरू केले आहेत.

कोरोनाबाबतीत जनजागृतीसाठी साडेसात हजार ठिकाणी २२ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक काम करीत आहेत. ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्र सुरू असून, तेथे ७ हजार ४७६ खाटांची व्यवस्था आहे. त्यातील २,२८५ खाटा ऑक्सिजनयुक्त आहेत. देशातील ७६२ शहरातील ८१९ सरकारी कोविड केअर केंद्रांमध्ये सहा हजाराहून अधिक कार्यकर्ते मदत करीत आहेत. आतापर्यंत १,२५६ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून ४४ हजार युनिट रक्त गोळा करण्यात आले आहे. तर चौदाशे ठिकाणी वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून दीड लाखाहून अधिक लोकांना मदत मिळाली असून, ४ हजार ४४५ चिकित्सक तेथे कार्यरत आहेत, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले. देशात ८१६ ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी सेवा दिली जात असून, ३०३ ठिकाणी शववाहिनी सेवा दिली जात आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh has set up helpline centers at 3,800 places across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.