रेतीमाफिया कृष्णा यादवला ‘एमपीडीए’अंतर्गत अटक

By admin | Published: January 18, 2017 02:41 AM2017-01-18T02:41:19+5:302017-01-18T02:41:19+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत रेतीमाफिया कृष्णा ऊर्फ किसना रामनाथ यादव

Rati mafia Krishna Yadava was arrested under 'MPDA' | रेतीमाफिया कृष्णा यादवला ‘एमपीडीए’अंतर्गत अटक

रेतीमाफिया कृष्णा यादवला ‘एमपीडीए’अंतर्गत अटक

Next

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मध्यवर्ती कारागृहात रवानगी
नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत रेतीमाफिया कृष्णा ऊर्फ किसना रामनाथ यादव (२६, रा. वॉर्ड क्रमांक - ३, चनकापूर, ता. सावनेर) यास ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांवर प्रतिबंध करणारा कायदा-१९८१)अंतर्गत अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली असून, त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
कृष्णा यादव हा खापरखेडा परिसरात ‘छोटा लतिफ’ नावानेही ओळखला जातो. त्याच्याविरोधात खापरखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध दारू विक्री करणे, शस्त्र बाळगणे तसेच रेतीची चोरी करणे अशा प्रकरच्या २६ गंभीर गुन्ह्यांनी नोंद आहे. त्याच्यावर रेतीचोरीचे सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याने खापरखेडा परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास तो धमकावत असत.
त्याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी खापरखेडा पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा दंडाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे सादर केला होता. त्यावर जिल्हादंडाधिकारी कुर्वे यांनी कृष्णा यादवला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश १३ डिसेंबर २०१६ रोजी निर्गमित केला होता. याची कुणकुण लागल्याने तो फरार झाला होता. त्यामुळे खापरखेडा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत होते.
त्यातच तो मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्याला लगेच अटक करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rati mafia Krishna Yadava was arrested under 'MPDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.