नागपुरात चौथ्या दिवशीही रेशन वाटप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:50 AM2020-06-05T01:50:44+5:302020-06-05T01:52:29+5:30

लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे.

Ration distribution stopped on the fourth day in Nagpur | नागपुरात चौथ्या दिवशीही रेशन वाटप बंद

नागपुरात चौथ्या दिवशीही रेशन वाटप बंद

googlenewsNext
ठळक मुद्देधान्य न मिळाल्याने गरीब-मध्यमवर्गीय कार्डधारक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे.
कोरोनाच्या संकटात रेशन दुकानदारांनीही आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे डॉक्टर, पोलीस, परिचारिका यांच्याप्रमाणे आम्हालाही कोविड योद्धा घोषित करून ५० लाखाच्या विम्याचे संरक्षण मिळावे, रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवण्यात यावे, आणि चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन देण्यात यावे, ई-पॉस मशीनमध्ये सुधारणा करावी, कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेणे बंद व्हावे, या मागणीसाठी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी १ जूनपासून रेशनमधील धान्य वितरण बंद केले आहे.
आज गुरुवारी या संपाचा चौथा दिवस होता. रेशन दुकानांवर जून महिन्याचे धान्य घेण्यासाठी कार्डधारक दररोज येत आहे. परंतु रेशन दुकान बंद असल्याने त्यांना परत जावे लागत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली आहे. एप्रिल-मे महिन्यातील धान्य लोकांना मिळाले आहे. परंतू जून महिन्याचे वाटप व्हायचे आहे. यासोबतच केंद्र सरकारकडून मिळणाºया मोफत तांदळाचे वितरणही थांबले आहे.

दुकानदारांच्या मागण्या सरकारकडे पाठवल्या
यावेळी धान्य वितरणाचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे अडचण नाही. परंतु रेशन दुकानदारांनी कोविड विम्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. विभाग आपल्या स्तरावर पूर्ण जबाबदारीने व्यवस्था सांभाळत आहे.
अनिल सवई, अन्न व पुरवठा अधिकारी

मागण्या पूर्ण झाल्यावरच दुकाने उघडणार
संपामुळे धान्य वितरण बंद आहे. लोकांप्रति आम्हाला सहानुभूती आहे. परंतु आमचीही अवस्था समजून घ्या. कोरोनाच्या संकटात आम्हीही जीव धोक्यात घालून काम करतोय. उद्या कोरोनाने आमचा जीव गेला तर आमच्या कुटुंबाचे काय होणार? त्यामुळे आम्हालाही कोविड विम्याचे कवच मिळायलाच हवे.
संजय पाटील,अध्यक्ष विदर्भ रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेता संघ

Web Title: Ration distribution stopped on the fourth day in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.