रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात होतेय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:36+5:302021-09-15T04:12:36+5:30

नरखेड/कामठी/पारशिवनी/खापरखेडा : केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. ...

Ration grains are sold in the open market | रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात होतेय विक्री

रेशनच्या धान्याची खुल्या बाजारात होतेय विक्री

googlenewsNext

नरखेड/कामठी/पारशिवनी/खापरखेडा : केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. देशातील शेवटचा माणूस भुकेला राहू नये, त्याला दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून या योजना सुरू करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. यासाठी अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील कुटुंबाना २० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या योजनेतील जवळपास ५० टक्के धान्य थेट खूल्या बाजारात विकले जात असल्याचे आढळून येत आहे.

अन्न सुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. त्यात गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये प्रति किलो याप्रमाणे व प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य दिले. प्रधानमंत्री अन्न योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. चार जणांच्या कुटुंबीयांना अंत्योदय योजनेत ५५ किलो धान्य व अन्नसुरक्षा योजनेत ४० किलो धान्य मिळते.

ग्रामीण भागातील ७५ टक्के कुटुंबाना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य पुरविल्या जाते. स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटपात हेराफेरी करतात असा आरोप होता. आता लाभार्थ्याला प्रत्यक्ष दुकानात जाऊन यंत्रावर ठसा उमटवावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना हेराफेरी करण्यास वाव नाही. मुळात कुटुंबाच्या गरजेपेक्षा मोफत व विकत दिले जाणारे धान्य अधिकचे मिळते. दोन वेळचे भरपेट जेवण घेतले तरी ५० टक्के धान्य वापरले जात नाही. त्यामुळे हे धान्य बाजारपेठेत विकल्या जाते.

स्वस्त धान्य दुकानातील आलेल्या धान्याचे वितरण करण्यास किमान चारपाच दिवस लागतात. वितरण झाल्यानंतर लहान व्यापारी गावखेड्यात सक्रिय होऊन लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करतात. ते तालुकास्तरावर गोळा करून विकल्या जाते. तालुकास्तरावरील व्यापारी हे धान्य मोठ्यामोठया ट्रकमध्ये लोड करून नागपूर व मध्य प्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्याकडे पाठवितात.

दोन रुपये किलोने खरेदी केलेल्या गव्हाला आठ ते दहा रुपये व तीन रुपये किलोने खरेदी केलेल्या तांदळाला दहा ते बारा रुपये भाव देऊन लाभार्थ्यांकडून खरेदी केल्या जाते व नफा कमावून ते धान्य खुल्या बाजारात आणल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही.

नरखेड तालुक्यात अंत्योदय योजनेत ८ हजार ४३९ कार्डधारक व ३४ हजार १२४ लाभार्थी आहेत. अन्न सुरक्षा योजनेत २० हजार ८७ कार्डधारक व ९० हजार ६४४ लाभार्थी आहेत. केसरी कार्डधारकांची संख्या ४ हजार ८२१ आहे. तालुक्यात एकूण ३४ हजार ६५ शिधापत्रिकाधारक असून १ लाख ५० हजार ५४६ लाभार्थी आहेत.

-

Web Title: Ration grains are sold in the open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.