राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले निर्बंधांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:53+5:302021-09-10T04:11:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण वाढण्याचा हवाला देत जिल्ह्यात येत्या तीन दिवसात निर्बंध लावण्याचे संकेत देणारे पालकमंत्री ...

Raut's U-turn, said restrictions are not needed | राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले निर्बंधांची गरज नाही

राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले निर्बंधांची गरज नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण वाढण्याचा हवाला देत जिल्ह्यात येत्या तीन दिवसात निर्बंध लावण्याचे संकेत देणारे पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी यू-टर्न घेतला. सध्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राऊत यांनी सांगितले होते की, जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट दाखल होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांपर्यंत आली आहे. अशा परिस्थितीत व्यापारी व इतर घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्यात येतील. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत उघडी ठेवणे व शनिवार-रविवारी पूर्ण बंद ठेवण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

शहरातील व्यापारी संघटनांनीही याला विराेध दर्शविला होता. संक्रमित रुग्णांची संख्या पाहता सध्या कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता नसल्याचे मोठ्या संख्येने लोकांचे म्हणणे हाेते. काँग्रेसचेच मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा राऊत यांच्या वक्तव्याशी सहमत नव्हते. नागपुरात सध्यातरी कठोर निर्बंधांची गरज नसल्याचे त्यांनी उघडपणे म्हटले होते.

-बॉक्स

दबावात बदलला निर्णय

कठोर निर्बंधांबाबत होत असलेला विरोध पाहता पालकमंत्री राऊत यांना आपला निर्णय बदलावा लागला. शहरातील व्यापारी संघटना सातत्याने सांगत होते की, सध्या संक्रमण इतके वाढलेले नाही की, दुकाने बंद करावी लागतील. जर, अशी परिस्थिती निर्माण झालीच तर, ते सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ उभे राहतील, असेही व्यापारी संघटनांचे म्हणणे होते.

Web Title: Raut's U-turn, said restrictions are not needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.