रवींद्र भोयर यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ; इतकी आहे संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:07 PM2021-11-24T12:07:48+5:302021-11-24T12:14:03+5:30

सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे.

Ravindra Bhoyar's wealth doubles in past years | रवींद्र भोयर यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ; इतकी आहे संपत्ती

रवींद्र भोयर यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ; इतकी आहे संपत्ती

Next
ठळक मुद्देविधान परिषदेच्या रिंगणात तीन कोट्यधीश उमेदवार पाचपैकी चार उमेदवारांवर गुन्हे दाखल

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यावर लगेच विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उमेदवारी भेटलेल्या रवींद्र भोयर यांनी मंगळवारी नामांकन अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार भोयर यांच्या चल व अचल संपत्तीचा आकडा पावणेचार कोटींच्या घरात आहे. २०१७ सालापासून भोयर यांच्या संपत्तीच्या एकूण मूल्यांकनात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

२०१७ साली भोयर यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग ३१ मधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी भोयर व कुटुंबीयांच्या नावाने असलेली संपत्ती १ कोटी ६० लाखांहून अधिक होती. सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे.

भोयरांविरोधात तीन गुन्हे

रवींद्र भोयर यांच्याविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा गुन्हेगारी अतिक्रमणाचा असून दुसरा गुन्हा मानवी जीवनाच्या व्यक्तिगत सुरक्षेला धोक्यात टाकण्यासंदर्भातील आहे.

८० टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे

या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी एक अपक्ष उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत.

६० टक्के उमेदवारच पदवीधर

निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी तीनच उमेदवारांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. एका उमेदवाराची पदवी पूर्ण होऊ शकली नाही. तर एका उमेदवाराचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच झाले आहे.

६० टक्के उमेदवार कोट्यधीश

पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार सधन आहेत. तर एका उमेदवाराची संपत्ती केवळ ३५ हजार रुपये इतकी आहे. कोट्यधीश असलेल्या तीनही उमेदवारांनी याअगोदर विधानसभा किंवा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली आहे. २०१४ व २०१७ च्या तुलनेत या उमेदवारांच्या संपत्तीत अनेक टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: Ravindra Bhoyar's wealth doubles in past years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.