नागपूरकरांच्या संयमाची पुन्हा परीक्षा : शनिवार-रविवार बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:42 PM2021-03-05T23:42:42+5:302021-03-05T23:45:17+5:30

Corona, market bandh वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरकरांनी गेल्या शनिवारी व रविवारी आपल्या संयमाचा परिचय देत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा शनिवार ६ मार्च आणि रविवार ७ मार्च रोजी प्रशासनाने बंदचे आवाहन केले आहे.

Re-examination of Nagpurkars' restraint: Saturday-Sunday markets, establishments, offices closed | नागपूरकरांच्या संयमाची पुन्हा परीक्षा : शनिवार-रविवार बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद

नागपूरकरांच्या संयमाची पुन्हा परीक्षा : शनिवार-रविवार बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरकरांनी गेल्या शनिवारी व रविवारी आपल्या संयमाचा परिचय देत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा शनिवार ६ मार्च आणि रविवार ७ मार्च रोजी प्रशासनाने बंदचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात ज्याप्रकारे नागपूरकरांकडून सहकार्य मिळाले, त्याचप्रकारच्या सहकार्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांना एकजूटता, संयम व समर्थनाचा परिचय द्यावा लागेल. शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात एकाच दिवशी १३९३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो अनियंत्रित होण्याच्या दिशेने आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शनिवार-रविवारच्या निर्बंधामध्ये यावेळी अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे. यात चिकन, मटण, अंडी यांची दुकाने सुरू राहतील. वाहन दुरुस्ती, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने सुद्धा दोन्ही दिवशी सुरू राहतील. दुकान, बाजार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहतील. प्रशासनातर्फे या काळात तपासणी मोहीम राबवली जाईल. यात नियम व कायद्याचे उल्लंघन करताना कुणी आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. मनपाच्या एनडीएस पथकातर्फे दररोज तपासणी केली जाईल.

हे राहील सुरू...

- वैद्यकीय सेवा

- वर्तमानपत्र व मीडिया

- दूध दुकान व पुरवठा

- फळे व भाजीपाला

- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

- सर्व प्रकारची वाहतूक सेवा

- बांधकाम

- उद्योग व कारखाने

- किराणा दुकान

- चिकन, मटण, अंडी दुकान

- वाहन दुरुस्ती, वर्कशॉप

- वाहन मरम्मत, वर्कशॉप

- पशुखाद्य दुकान

- बँक-पोस्ट सेवा (नियमानुसार)

हे राहतील बंद...

- दुकान, बाजार

- मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह

- हॉटेल, रेस्टॉरंट (बसून खाण्याची सुविधा बंद, ऑनलाईन डिलिवरीसाठी किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल,)

- सर्व खासगी कार्यालये

- सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा सोडून)

दारू दुकाने बंद, घरपोच सेवा सुरू

जिल्हा प्रशासनाने शनिवार-रविवारी दारूचे दुकान व बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या शनिवारी बंदच्या पहिल्या दिवशी दारूचे दुकान सुरू राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी प्रशासनाने दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी, घरपोच सेवा सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात बंद असलेली चिकन, मटण, अंडी दुकान मात्र यावेळी सुरू राहणार आहेत.

Web Title: Re-examination of Nagpurkars' restraint: Saturday-Sunday markets, establishments, offices closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.