आणखी दहा अभ्यासक्रमांची फेरपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:11+5:302021-08-12T04:12:11+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यापीठाने आणखी १० अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीएस्सी चतुर्थ सत्रासह दहा अभ्यासक्रमांतील काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांचा फटका बसला होता. अनेकांना पेपर देता आले नाही तर काही जणांचे पेपर आपोआप सबमिट झाले. अखेर यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. यात बीएस्सी, बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (आयटी), बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बी.ए., बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्लू. या अभ्यासक्रमांच्या चौथ्या सत्राच्या परीक्षांचा समावेश आहे.
परीक्षा - दिनांक
बीएस्सी, बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (आयटी) - चतुर्थ सत्र : १४ ऑगस्ट
बीकॉम, बीबीए, बीसीसीए (चतुर्थ सत्र) : १६ ऑगस्ट
बी.ए., बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्लू. (चतुर्थ सत्र) - १६ व १७ ऑगस्ट
.