गुन्ह्याच्या ठिकाणी, गुन्हेगारापर्यंत जलदगतीने पोहचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:04 AM2020-11-04T00:04:43+5:302020-11-04T00:07:06+5:30

Bit marshal workshop Reach the scene of the crime quicklyलोकांमध्ये मिसळा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि गुन्ह्याच्या ठिकाणी तसेच गुन्हेगारापर्यंत जलदगतीने पोहचण्याचा प्रयत्न करा, असा गुरुमंत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बीट मार्शल्सना दिला.

Reach the scene of the crime quickly | गुन्ह्याच्या ठिकाणी, गुन्हेगारापर्यंत जलदगतीने पोहचा

गुन्ह्याच्या ठिकाणी, गुन्हेगारापर्यंत जलदगतीने पोहचा

Next
ठळक मुद्देबीट मार्शलची कार्यशाळा - वरिष्ठांनी दिला गुरुमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - लोकांमध्ये मिसळा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि गुन्ह्याच्या ठिकाणी तसेच गुन्हेगारापर्यंत जलदगतीने पोहचण्याचा प्रयत्न करा, असा गुरुमंत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बीट मार्शल्सना दिला. सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस पोलीस जिमखान्यात शहरातील विविध पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या बीट मार्शल्सची कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या १८२ बीट मार्शल्सना गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांनी मार्गदर्शन केले. शहरातील विविध भागात फिरून गुन्हेगार आणि गुन्ह्यांना नियंत्रित करण्याची पहिली जबाबदारी बीट मार्शलवर येते. त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात ते फिरत असल्याने कोणतीही घटना अथवा गुन्हा घडल्यास त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचणे अपेक्षित असते. त्याला पोलिसांच्या भाषेत रिस्पॉन्स टाइम म्हणतात. नियंत्रण कक्षाला माहिती देऊनही अनेक ठिकाणी तातडीने पोलीस पोहचत नसल्याची नागिरकांची सातत्याने तक्रार असते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम कमी करून प्रभावी तसेच परिणामकारक पुलिसिंग करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.

व्हिजिलिंग पुलिसिंग असावी

चेन स्नॅचिंग, हाणामारी, जबरी चोरी, महिला-मुलांच्या संबंधाने घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पीडितांची तातडीने मदत करून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करा, वरिष्ठांना माहिती द्या, असेही निर्देश या कार्यशाळेत उपस्थित बीट मार्शल्सना देण्यात आले. रस्त्यारस्त्यावर पोलीस दिसले पाहिजे (व्हिजिलिंग पुलिस) असेही यावेळी ठासून सांगण्यात आले.

Web Title: Reach the scene of the crime quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.