विकास आराखड्यावर जाणून घेणार प्रतिक्रिया

By admin | Published: May 24, 2016 02:50 AM2016-05-24T02:50:37+5:302016-05-24T02:50:37+5:30

स्मार्ट सिटी अभियानात जोर लावल्यानंतरही नागपूर महापालिकेला अपयश आले.

The reaction to know about the development plan | विकास आराखड्यावर जाणून घेणार प्रतिक्रिया

विकास आराखड्यावर जाणून घेणार प्रतिक्रिया

Next

स्मार्ट सिटी अभियान : फ्रान्सचे पथक आज नागपुरात
नागपूर : स्मार्ट सिटी अभियानात जोर लावल्यानंतरही नागपूर महापालिकेला अपयश आले. परंतु दुसऱ्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत नागपूर शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या टप्प्यात पारडी, भरतवाडा व पुनापूरचा विकास समाविष्ट करण्यात आला आहे. यावर या भागातील
नागरिकांच्या प्रतिक्रिया व मते घेतली जाणार आहेत. चर्चेनंतर या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी फ्रान्सचे पथक नागपूर दौऱ्यावर येत आहे. पथक काही महत्त्वाच्या सूचना करणार आहे. स्मार्ट सिटीसाठी तांत्रिक मदत देण्याची तयारी यापूर्वीच फ्रान्सने दर्शविली आहे. नागपूर शहराचा स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत करार केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे पथक नागपुरात येत आहे. महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या विकास आराखड्याचे काम सुरू केले आहे. जुन्या आराखड्यात अनेक बदल केले जाणार आहेत. विकास शुल्काला नागरिकांनी विरोध दर्शविला होता.
परंतु स्मार्ट सिटीसाठी नागपूरची निवड न झाल्याने हा मुद्दा मागे पडला होता. (प्रतिनिधी)

नागरिकांचा सहभाग अपेक्षित
स्मार्ट सिटी अभियानात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग अभिप्रेत आहे. त्यामुळे गेल्यावेळी नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याात आले होते. आता पुन्हा नागरिकांपुढे जाण्याची तयारी महापालिकेला प्रशासनाने केली आहे. यासोबतच शहराच्या विकासावर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: The reaction to know about the development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.