जगभरातील वाचकांनी गौरविले गायधनींचे ‘देवदूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:44+5:302021-03-21T04:07:44+5:30
नागपूर : सुधाकर गायधनी यांचे ‘देवदूत’ हे महाकाव्य जगभरातील काव्यरसिकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘देवदूत’चे इंग्रजीसह इटालियन, रोमानियन, चायनिज व ...
नागपूर : सुधाकर गायधनी यांचे ‘देवदूत’ हे महाकाव्य जगभरातील काव्यरसिकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘देवदूत’चे इंग्रजीसह इटालियन, रोमानियन, चायनिज व मॅसोडोनियम या भाषांमध्ये अनुवाद होणे, हे त्याचेच द्योतक आहे.
हे महाकाव्य युरोपियन काव्यरसिकांच्या विशेष पसंतीस उतरले असून, त्याचे विविध युरोपियन भाषांमध्ये अनुवाद केले जात आहेत. इटलीच्या ‘रिव्ह्यूअर्स व्हॉईस’ या नियतकालिकाने गायधनींच्या ‘जेरुसलेम’ या कवितेचे इटालियन कवयित्री इंझा यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला आहे. ग्रीक कवयित्री मारिया यांनी गायधनींच्या ‘माय पोयम’ या कवितेचा ग्रीक भाषेत अनुवाद केला आहे.
यापूर्वी ‘देवदूत’ या कवितेचा रोमानियन भाषेतील अनुवाद रोमानिया येथील आंतरराष्ट्रीय मासिकाने प्रकाशित केला होता. अमेरिकेतील ‘डेस्टाईन लिटरेर’ या मासिकानेही गायधनींचा परिचय ‘देवदूत’सह प्रकाशित केला आहे. अल्बनिया येथील रायटर्स असोसिएशनने आपल्या मासिकात या कवितेचा पूर्वार्ध प्रकाशित केला. पेरू येथील कवी कॅरलॉस हे या कवितेचा स्पॅनिश भाषेत अनुवाद करीत आहेत. गायधनी यांच्या काही कवितांचे जर्मन, अरेबिक, अल्बनियन, ग्रीक, बंगाली आणि गुजराती भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘देवदूत’चा पाश्चिमात्य भाषांसह हिंदी आणि तामिळमध्येही अनुवाद झाला आहे. मंगोलिया येथे २०१७ मध्ये पार पडलेल्या ३७ व्या विश्व कवि परिषदने त्यांना मानद डी. लिट. पदवीने सन्मानित केले आहे.
......