नकली सोने देऊन असली लंपास

By admin | Published: July 23, 2016 03:21 AM2016-07-23T03:21:05+5:302016-07-23T03:21:05+5:30

सोन्याच्या हव्यासापायी एका महिलेला आपल्या अंगावरील ८० हजाराचे असली सोने गमावण्याची वेळ आली.

Real lump by giving fake gold | नकली सोने देऊन असली लंपास

नकली सोने देऊन असली लंपास

Next

आंतरराज्यीय टोळी सक्रिय : महिलेला ८० हजाराने फसविले
नागपूर : सोन्याच्या हव्यासापायी एका महिलेला आपल्या अंगावरील ८० हजाराचे असली सोने गमावण्याची वेळ आली. ही घटना अजनी पोलीस ठाणे परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात नकली सोने देऊन लुटणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
जुना सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय आरती बेरी यांचे अजनी येथे डेली निड्सचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास २४ वर्षाचा एक तरुण त्यांच्या दुकानात आला. तो जमीन खोदण्याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले. जमीन खोदत असतांना दागिने सापडल्याचे सांगितले. बहिणीचे लग्न असल्याने हे दागिने विकून देण्याची विनंती केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आरती यांनी त्याला दागिने आणून दाखवण्यास सांगितले. त्या तरुणाने आरती यांना एक चेन दिली. तेव्हा ओळखीच्या सोनाराकडून तपासल्यानंतरच दागिने विकून देईल, असेही सांगितले. त्या तरुणाने दहा-वीस हजार रुपये मागितले. परंतु सध्या आपल्याजवळ पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा गँरटी म्हणून युवकाने आरती यांना त्यांची सोनसाखळी मागितली. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी सोनसाखळी व दोन सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे किमत ८० हजार रुपये )सुद्धा त्या युवकाला दिल्या. थोड्या वेळात परत येत असल्याचे सांगून तो फरार झाला.
आरती यांनी जेव्हा त्या तरुणाने दिलेली चेन सोनाराकडून तपासून घेतली. तेव्हा ती नकली असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या युवकाने आरती यांना एकदा फोन सुद्धा केला होता. त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारावर तो राजस्थान येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नकली सोने देऊन लुटणारी आंतराज्यीय टोळीचा तो सदस्य असावा, असा पोलिसांना संशय आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: Real lump by giving fake gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.