रिअॅलिटी चेक : रांगेत उभे असूनही चाचणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 09:46 PM2020-08-29T21:46:14+5:302020-08-29T21:49:53+5:30
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने चाचणी करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना चाचणी करता यावी यासाठी महापालिकेने झोननिहाय ३४ कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ अशी चाचणीची वेळ निश्चित केली आहे. परंतु या निर्धारित वेळेत तपासणीसाठी रांगेत लागलेल्या लोकांना परत पाठविले जाते. काही केंद्रांवर ५० रुग्णांची तपासणी केली की काम बंद होत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने चाचणी करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना चाचणी करता यावी यासाठी महापालिकेने झोननिहाय ३४ कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ अशी चाचणीची वेळ निश्चित केली आहे. परंतु या निर्धारित वेळेत तपासणीसाठी रांगेत लागलेल्या लोकांना परत पाठविले जाते. काही केंद्रांवर ५० रुग्णांची तपासणी केली की काम बंद होत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
काही केंद्रावर तपासणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्टसाठी बोलावले जाते. दुसरीकडे केंद्रावरील गर्दीमुळे संसर्गाचा धोका असल्याने चाचणीसाठी येणाऱ्यांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण आहे.
सूचना व माहिती फलक नसल्याने संभ्रम
केंद्रावर नेमक्या किती लोकांची तपासणी केली जाणार,किती लोकांना तपासणीसाठी टोकन दिले. रांगेत उभे राहिल्यानंतर चाचणी होईल की नाही. चाचणीचा अहवाल कधी मिळणार याबाबत कुठल्याही स्वरूपाची माहिती मिळत नसल्याने केंद्रावर गोंधळाचे वातावरण आहे.
तपासणी केंद्रांचा आढावा घेणार- आयुक्त
निर्धारित वेळेत तपासणी केंद्रावर पोहोचलेल्या व्यक्तींची तपासणी झाली पाहिजे. केंद्राची क्षमता किती आहे. किती लोकांना टोकन दिले त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. टेस्टिंग सेंटरचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
अशी आहेत चाचणी केंद्र
सहा केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था यात प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राजनगर आदींचा समावेश आहे. अॅन्टिजन चाचणीची व्यवस्था २८ केंद्रावर आहे. यात जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारी पहाड प्राथमिक आरोग्य केंद्र, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, बिडीपेठ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतिनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, हुडकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र, नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नारा प्राथमिक आरोग्य केंद्र, कपिल नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डायग्नोस्टिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी बॉईज होस्टेल कळमना, कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र, के.टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.