गाड्यांची तपासणी करताना होणाऱ्या बेपर्वाईवर कारवाई करावी; अंबादास दानवेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:49 PM2022-12-23T12:49:49+5:302022-12-23T12:53:06+5:30
Winter Session Maharashtra 2022 : परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप
नागपूर : दरवर्षी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी केली जाते, त्या दरम्यान बेपर्वाई केली जात असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणत यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार सचिन अहिर यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा झालेला अपघातावर लक्षवेधी उपस्थित केली. त्याला अनुसरून दानवे यांनी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप केला. तसेच अपघात झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाश्यांचा भरणा केला होता का? त्यात किती प्रवासी प्रवास करत होते? हे प्रश्न उपस्थित केले.
मोठया प्रवासादरम्यान मध्ये प्रवासी घेऊ नये असे नियम असताना बसचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करतात असा आरोप दानवे यांनी केला.