विद्यापीठातील प्राध्यापकांच्या चार पेटंटला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:47+5:302021-07-19T04:07:47+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार पेटंटला मान्यता ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार पेटंटला मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने एकाच महिन्यात चार पेटंटला मान्यता दिली आहे.
सोलर सेलच्या कार्यक्षमतेला वाढविणाऱ्या घटकांवर त्यांनी संशोधन केले व याअंतर्गत डाऊन कन्व्हर्शन फॉस्फोरसची निर्मिती केली.
ढोबळे यांच्या संशोधन चमूमध्ये डॉ. निरुपमा ढोबले, यतीश परौहा, अभिजित कदम, दिगंबर ओवाल, सोनल तत्ते-शेलके, रामकुमार कांबळे, डॉ. विभा चोपडा व डॉ. विशाल पानसे यांचा समावेश आहे. डॉ. ढोबळे यांना ल्युमिनेसन्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नऊ पेटंटला मान्यता मिळाली असून ३१ पेटंट प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, डॉ.राजेश सिंह, डॉ.ओमप्रकाश चिमणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.