नागपूर विद्यापीठात अल्पसंख्यांक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:01+5:302021-06-18T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आवारात २०० प्रवेश ...

Recognition of hostel for minority students in Nagpur University | नागपूर विद्यापीठात अल्पसंख्यांक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाला मान्यता

नागपूर विद्यापीठात अल्पसंख्यांक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाला मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आवारात २०० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतिगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

नागपूर हे विदर्भ आणि परिसरातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. इथे परिसरातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण निवासाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते. किंबहुना यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही थांबते. यासाठी प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरांमध्ये खास मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे. या विद्यार्थिनींसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच विद्यापीठ आवारांमध्ये वसतिगृह बांधण्याचा निर्णय अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे वसतिगृह बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बांधकामासाठी १४ कोटी ८२ लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Recognition of hostel for minority students in Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.