नागपूर व बुलडाण्यात रुग्णसंख्येचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:07+5:302021-03-27T04:08:07+5:30

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गोंदिया व गडचिरोली जिल्हा सोडल्यास इतर ९ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी दैनंदिन रुग्णांची ...

Record number of patients in Nagpur and Buldana | नागपूर व बुलडाण्यात रुग्णसंख्येचा विक्रम

नागपूर व बुलडाण्यात रुग्णसंख्येचा विक्रम

Next

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गोंदिया व गडचिरोली जिल्हा सोडल्यास इतर ९ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी दैनंदिन रुग्णांची संख्या २०० वर गेली. ७,५९६ नव्या रुग्णांची भर पडली, तर ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यांत मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा विक्रम स्थापन झाला. बाधितांची संख्या ४०९५ झाली. ३५ रुग्णांचा बळी गेला. बुलडाण्यातही सार्वधिक रुग्णांची नोंद झाली. ९०३ रुग्ण व २ मृत्यू झाले. वाशिम जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढले. ५७५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या स्थिर असली तरी ९ रुग्णांचा मृत्यू झाला. या जिल्ह्यात २१२ रुग्ण आढळून आले. यवतमाळ जिल्ह्यात ४५८ रुग्ण व ७ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३९५ रुग्ण व ४ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात २८६ रुग्ण व ५ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात २८५ रुग्ण व २ मृत्यू, तर वर्धा जिल्ह्यात २२२ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू

नागपूर : ४०९५ : २१११६२ : ३५

गोंदिया :९६ : १५५२६ : ०१

भंडारा :२८५:१६१५०:०२

चंद्रपूर :२१२:२६७०१:०२

वर्धा : २२२: १७७०९ :०९

गडचिरोली :६९: १०३९७: ००

अमरावती : २८६ : ४७२८३ :०५

यवतमाळ : ४५८ : २६७३३ : ०७

वाशिम : ५७५: १४५६९ :०२

बुलडाणा : ९०३: ३४००५ :०२

अकोला : ३९५ : २६३४८ : ०४

Web Title: Record number of patients in Nagpur and Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.