नागपुरात वाहनचोरीचादेखील विक्रम; एकाच चोरट्याने चोरल्या १११ दुचाकी

By योगेश पांडे | Published: February 7, 2024 07:17 PM2024-02-07T19:17:51+5:302024-02-07T19:18:24+5:30

अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर लागला शोध : ‘ट्वेल्थ पास’ बनला सराईत वाहनचोर

record of vehicle theft in nagpur one thief stole 111 bikes | नागपुरात वाहनचोरीचादेखील विक्रम; एकाच चोरट्याने चोरल्या १११ दुचाकी

नागपुरात वाहनचोरीचादेखील विक्रम; एकाच चोरट्याने चोरल्या १११ दुचाकी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : उपराजधानीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढीस लागले असून सर्वसाधारणत: हे चोर टोळ्यांमध्ये काम करतात. मात्र नागपुरात एका चोरट्याने दोन वर्षांत चक्क १११ दुचाकी चोरून त्यांची नऊ जिल्ह्यांमध्ये विक्री केली. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत या बारावी पास वाहनचोराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपीचा शोध लागला. वाहनचोरीच्या प्रकरणांमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

ललित गजेंद्र भोगे (२४, विकासनगर, कोंढाळी) असे आरोपीचे नाव आहे. २१ डिसेंबर रोजी अनिल पखाले (वाडी) यांची दुचाकी चोरी गेली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरी गेल्याची बाब समोर आली. शहरातील वाहनचोरीचे प्रमाण वाढीस लागल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने तपास सुरू केला. ज्या भागात चोरी झाल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पथकाने चोरी झालेले हॉटस्पॉट्स निश्चित केले व अडीचशेहून अधिक सीसीटीव्हीचे हजारो तासांचे फुटेज तपासले. त्यात काही ठिकाणी आरोपी ललित भोगे आढळून आला. पोलिसांकडे वाडीपर्यंतच्या सीसीटीव्हीचा ‘ॲक्सेस’ होता. त्यानंतर हा आरोपी कुठे जातो हे लक्षात येत नव्हते. पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास केला असता ललित कोंढाळीतीलल्सतल्याची बाब समोर आली. कोंढाळीत पाहणी केली असता तो आढळला. त्याच्याकडे संशयित वाहनदेखील होते. त्याला विचारणा केली असता अगोदर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली केली. पोलिसांनी त्याच्या घराच्याच परिसरातून २० चोरीची वाहने जप्त केली.

नऊ जिल्ह्यांतील वाहनांवर मारला हात

ललितची कसून चौकशी केली असता व पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली अशा नऊ जिल्ह्यांतून ११ वाहने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता वाहनचोरीचे ८५ गुन्हे उघडकीस आले. उर्वरित दुचाकीचे गुन्हे कुठे नोंदविल्या गेले आहेत याचा शोध सुरू आहे.

Web Title: record of vehicle theft in nagpur one thief stole 111 bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.