फिरणाऱ्या काेराेना रुग्णांवर गुन्हा नाेंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:36+5:302021-05-12T04:09:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : गृहविलगीकरणात असलेले काेराेना रुग्ण जर बाहेर फिरत असतील आणि काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असेल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : गृहविलगीकरणात असलेले काेराेना रुग्ण जर बाहेर फिरत असतील आणि काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असेल तर त्यांच्यावर साथराेग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नाेंदवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी माेवाड (ता. नरखेड) नगर परिषद कार्यालयातील आढावा बैठकीत दिले. यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्याकडून माेवाड शहरातील काेराेना संक्रमण, रुग्णसंख्या व उपाययाेजना याबाबत माहिती जाणून घेतली.
खासगी डाॅक्टरांकडे काेराेनाची लक्षणे असलेले रुग्ण तपासणीसाठी आले तर त्यांनी लगेच माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्राला त्या रुग्णाबाबत माहिती द्यावी. शहरातील काेराेना संक्रमित रुग्ण पूर्णपणे बरा हाेईपर्यंत घराबाहेर पडणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. ताे रुग्ण घराबाहेर जर पडला तर त्याच्यावर गुन्हा नाेंदवावा, असे आदेश मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना दिले, तर शहरात आशासेविका व अंगणवाडी सेविका नसतील तर त्यांच्या जागी जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती करावी, असे आदेश तहसीलदार डी. जी. जाधव यांना दिले.
माेवाड शहर अमरावती जिल्हा व मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने या सीमावर्ती भागातून आत येणाऱ्या नागरिकांची अँटिजन टेस्ट करावी. शहरातील पिण्याच्या पाण्यात सहा महिन्यापासून ब्लिचिंग पावडर टाकले नाही. त्यामुळे ही समस्या साेडवावी. काेराेना रुग्णाच्या घराला प्रतिबंध सूचनापत्र लावावे, आदी सूचनाही नागरिकांनी या बैठकीत केल्या. प्राथमिक आराेग्य केंद्रात कर्मचारी नियुक्त करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार डी. जी. जाधव, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, ठाणेदार जयपालसिंग गिरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोळंके, भावना शेंदरे, उकेश चव्हाण, अनिल साठोणे, रवी माळोदे, इस्माईल बारुदवाले, दिनेश पांडे, रवींद्र भंदिर्गे, राहुल चव्हाण, श्रीकांत मालधुरे, नितीन तपकीर, दत्तात्रेय चाटी, केशव कळंबे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित हाेते.