मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:11 AM2021-08-26T04:11:53+5:302021-08-26T04:11:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वित्तवर्षात मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा तसेच थकबाकीदारांवर ...

Recover Rs 332 crore from property tax | मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा

मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वित्तवर्षात मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा तसेच थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.

आर्थिक वर्षातील करवसुली हा दैनंदिन कामाचा भाग आहे. करविभागातील निरीक्षकांनी थकबाकी वसूल केल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण नाही. यासाठी थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

कर व करआकारणी विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, हरीश राऊत, अशोक पाटील, सुषमा मांडगे, किरण बगडे, साधना पाटील, करविभागाचे करनिर्धारक व संग्राहक दिनकर उमरेडकर व कर अधीक्षक गौतम पाटील यांच्यासह सर्व झोनचे करनिरीक्षक उपस्थित होते.

बैठकीत झोननिहाय करवसुली, महिन्याचे उद्दिष्ट व वसुली याचा आढावा घेतला. अर्थसंकल्पात वित्तवर्षात मालमत्ताकरातून २५६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण होण्यात अडचण नाही. परंतु, थकबाकी वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी पुढील सात महिन्यांचे नियोजन करा. कोरोनामुळे मागील वर्षी करवसुलीवर त्याचा परिणाम झाला. यावर्षी मात्र अशी परिस्थिती नाही. आकडेवारी झोन सहायक आयुक्तांनी सादर करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मागील पाच महिन्यांतील करवसुलीचा आढावा घेतला. विवादित मालमत्तांच्या करवसुलीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.

Web Title: Recover Rs 332 crore from property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.