एनव्हीसीसीच्या एलबीटी शिबिरात १४.५ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:42 PM2018-07-04T21:42:12+5:302018-07-04T21:46:17+5:30
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण्यात आला. शिबिरात एलबीटी असेसमेंटसह अनेक व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांनी असेसमेंट आॅर्डर सोपविले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी होते. मंचावर मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपायुक्त राजेश मोहिते, सीए आरती कुळकर्णी, सहायक आयुक्त (एलबीटी) मिलिंद मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक निशांत गांधी, चेंबरचे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष व एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, सीएएमआयटीचे अध्यक्ष व चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष अर्जुनदास कुकरेजा, राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सचिव संजय के. अग्रवाल, फारुखभाई अकबानी, रामअवतार तोतला, उमेश पटेल आणि जनसंपर्क अधिकारी शब्बार शाकीर उपस्थित होते.
हेमंत गांधी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी वीरेंद्र कुकरेजा, चेंबरचे पदाधिकारी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन व्यापारी संघटनांसाठी चांगले संकेत आहेत. शिबिरात लाभ न मिळालेल्या व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रकरणांचा निपटारा करावा.
कुकरेजा यांनी चेंबरचे आभार व्यक्त करीत एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात व्यापाऱ्यांचा सहयोग आणि शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनपा अधिकाऱ्यांचे आभार मानले. व्यापाऱ्यांनी मनपात येऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. त्याकरिता अधिकारी सहकार्य करतील.
मोहिते म्हणाले, भविष्यात मनपातर्फे व्यापाऱ्यांच्या सहकार्याने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. दीपेन अग्रवाल म्हणाले, भविष्यात व्यापाऱ्यांच्या हितासाठी अशा अनेक शिबिराचे आयोजन व्हावे.
प्रारंभी मनपा अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी स्टील हार्डवेअर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेश लखोटिया यांचे सहकार्य मिळाले. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.