विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणे महाविद्यालयाला भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:25 AM2018-05-17T01:25:52+5:302018-05-17T01:26:06+5:30

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन लाखो रुपये लाटणे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला महागात पडणार आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेदेखील महाविद्यालयावर ठपका लावत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची भूमिका घेतली आहे.

Recovery of additional fees from the students will be roamed | विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणे महाविद्यालयाला भोवणार

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणे महाविद्यालयाला भोवणार

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यता रद्द करणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेऊन लाखो रुपये लाटणे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला महागात पडणार आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनेदेखील महाविद्यालयावर ठपका लावत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्याची भूमिका घेतली आहे.
वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्काहून १० ते १२ हजार रुपये अतिरिक्त रक्कम घेण्यात आली होती, अशा तक्रारी विद्यापीठाकडे आल्या होत्या. वेगवेगळे कारण सांगून ही रक्कम घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना ‘कॉशन मनी’चा निधीदेखील वापस करण्यात आला नव्हता. विद्यार्थी संघटनांनीदेखील हा मुद्दा उचलला होता व विद्यापीठाकडे तक्रार केली होती. त्याआधारे विद्यापीठाने डॉ. श्रीकांत कोमावार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने विद्यापीठाला अहवाल सादर केला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या अहवालावर चर्चा झाली. समितीने महाविद्यालयाविरोधात फौजदारी कारवाईचीदेखील शिफारस केली होती.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन कॉलेजला दोषी ठरविण्यात आले. या महाविद्यालयाची मान्यताच काढून घेण्यात येणार असल्याची भूमिका कुलगुरूंनी घेतली आहे. या सर्व प्रक्रियेला सुमारे एक वर्ष लागणार असले तरी विद्यापीठ कारवाई करेल, डॉ.काणे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.सलीम चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Recovery of additional fees from the students will be roamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.