सुपारी तस्कराकडून वसुली, पोलिसांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:25+5:302021-08-28T04:11:25+5:30

नागपूर : सुपारीच्या तस्करीत असलेल्या ट्रान्सपोर्टच्या मजुरांना मारहाण करून हफ्ता वसुली केल्याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. परंतु ...

Recovery from betel nut smugglers, sensation in police | सुपारी तस्कराकडून वसुली, पोलिसांमध्ये खळबळ

सुपारी तस्कराकडून वसुली, पोलिसांमध्ये खळबळ

Next

नागपूर : सुपारीच्या तस्करीत असलेल्या ट्रान्सपोर्टच्या मजुरांना मारहाण करून हफ्ता वसुली केल्याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. परंतु सुपारीच्या व्यापाऱ्यांनी खरी माहिती देण्यास नकार दिल्यामुळे पोलीस गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

‘लोकमत’ने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर सुपारी तस्करीत असलेले ट्रान्सपोर्टर आणि इतवारी स्टेशन परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन आज ट्रान्सपोर्टर आणि व्यापाऱ्यांना विचारपुस केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. तस्करीत असलेल्या ट्रान्सपोर्टरला व्यवसायाची माहिती पुढे येण्याची भिती वाटत आहे. ते कानपूरच्या मोठ्या गुटखा व्यापाऱ्याला सुपारीचा पुरवठा करतात. नागपूरवरून ट्रकमध्ये बनावट कागदपत्रावर कानपूरला सुपारी पाठविण्यात येते. याच ट्रकमध्ये कानपूरवरून नागपुरात गुटखा आणण्यात येतो. गुटख्याचे पोते धान्याच्या पोत्यात लपवून आणण्यात येतात. ट्रक ट्रान्सपोर्ट ऐवजी थेट गुटखा विक्रेत्याकडे पोहोचतो. ट्रान्सपोर्टर आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेल्या फर्मवर तस्करी करतात. काही दिवसांपूर्वी कानपूरच्या जीएसटी विभागाने त्यांचे हे कृत्य पकडले होते. पोलिसांनी चर्चेत असलेल्या ट्रान्सपोर्टरसह इतवारी स्टेशन परिसरातील गुन्हेगार आणि त्यांच्या साथीदारांशी संपर्क साधला. दोघेही गुन्हा दाखल होईल या भितीने वसुली करीत नसल्याचे सांगत आहेत. पूर्व नागपुरातील नेत्यांशी निगडीत या ट्रान्सपोर्टरतर्फे मालधक्क्यावरून कोट्यवधी रुपयांचा माल लपूनछपुन उतरविण्यात येत असल्याची कबुली देण्यात आली आहे.

................

Web Title: Recovery from betel nut smugglers, sensation in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.