वाहतूक नियंत्रण सोडून पोलिसांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:44+5:302021-08-01T04:08:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : एमआयडीसी परिसरात राेज वाहतूक काेंडी हाेत असल्याने अपघात हाेतात. मात्र, एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील वाहतूक ...

Recovery of police leaving traffic control | वाहतूक नियंत्रण सोडून पोलिसांची वसुली

वाहतूक नियंत्रण सोडून पोलिसांची वसुली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : एमआयडीसी परिसरात राेज वाहतूक काेंडी हाेत असल्याने अपघात हाेतात. मात्र, एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पाेलीस या भागातील वाहतूक नियंत्रणाचे काम साेडून केवळ वसुली करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

एमआयडीसी परिसरात स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. नागपूर-हिंगणा मार्गावरील चौकांमध्ये वाहतूक पाेलिसांनी थांबून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करायला हवी; परंतु वर्दळ असलेल्या हिंगणा टी पॉइंट, ट्रॅक्टर कंपनी चाैक, सीआरपीएफ गेट, लोकमान्यनगर या चौकात वाहतूक पोलीस कधीच दिसून येत नाही. ते येथून काही अंतरावर एखाद्या झाडाच्या आडोशाला लपून केवळ वाहनचालकांना थांबवितात. त्यांच्याकडून वैध दंड व चिरीमिरी गोळा करतात.

एमआयडीसी व सीआरपीएफ परिसरात अशा अनेक ठिकाणी राेडलगत व दुकानांसमाेर ट्रक व इतर मालवाहू वाहने अवैधरीत्या उभे केले जातात. त्यांच्यावर मात्र वाहतूक पाेलीस काहीच कारवाई करीत नाही. उलट, घाईघाईने कामावर जात असलेल्या कामगारांना टार्गेट करतात. त्यांच्याशी उर्मट शब्दात बाेलून दंड वसूल करतात. कामगारांना एमआयडीसीतील काही कारखान्यांमोर थांबविणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार सामान्य झाले आहेत.

एमआयडीसी परिसर कामगारबहुल आहे. कामगारांकडून सक्तीची वसुली केली जाऊ नये. वाहतूक पोलिसांनी मुख्य चौकात थांबून वाहतूक नियंत्रित करावी तसेच यात दाेषी असणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात डिगडोहच्या सरपंच इंद्रायणी कालबांडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास उके, माजी उपसभापती सुरेश काळबांडे, माजी सरपंच चेतनलाल पांडे, माजी उपसरपंच राजू घाटोळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे, प्रदीप इंगोले, हेमंत देशमुख, राजेश बोरकर, अनिल शर्मा, शार्दूल कथलकर यांचा समावेश हाेता.

Web Title: Recovery of police leaving traffic control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.