नागपुरात हवामान खात्यातर्फे ‘रेड अलर्ट’ जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:34 AM2019-07-02T10:34:36+5:302019-07-02T10:35:23+5:30
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली. दिवसभर केवळ काही वेळ तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, मंगळवारी हवामान खात्यातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’च जारी करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली. दिवसभर केवळ काही वेळ तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, मंगळवारी हवामान खात्यातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’च जारी करण्यात आला आहे. नागपुरातदेखील अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ८.३० पासून २४ तासात नागपुरात ७५.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. २ व ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस येऊ शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नागपुरात मंगळवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी कमाल ३०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.