पायी जाणाऱ्या मजुरांसाठी धावली लाल परी; नागपुरातून ९२२ बसेसची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:55 AM2020-05-21T09:55:57+5:302020-05-21T09:56:17+5:30

लॉकडाऊनमध्ये महिनाभर आपल्या जवळील पैसे खर्च करून दिवस काढणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पायीच आपल्या गावाकडे जाणे सुरू केले. अशा बिकट स्थितीत एसटी महामंडळाने मजुरांसाठी नि:शुल्क बसेस चालविण्याचा निर्णय घेतला.

Red fairy running for laborers on foot; Arrangement of 922 buses from Nagpur | पायी जाणाऱ्या मजुरांसाठी धावली लाल परी; नागपुरातून ९२२ बसेसची व्यवस्था

पायी जाणाऱ्या मजुरांसाठी धावली लाल परी; नागपुरातून ९२२ बसेसची व्यवस्था

Next
ठळक मुद्दे२०७७२ मजूर छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या सीमेवर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
दयानंद पाईकराव
नागपूर : लॉकडाऊनमध्ये महिनाभर आपल्या जवळील पैसे खर्च करून दिवस काढणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पायीच आपल्या गावाकडे जाणे सुरू केले. अशा बिकट स्थितीत एसटी महामंडळाने मजुरांसाठी नि:शुल्क बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातून एकूण ९२२ च्या माध्यमातून २०७७२ मजुरांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवून देण्यात आले. पायी जाणाऱ्या मजुरांना लाल परीने दिलेल्या सेवेमुळे मजुरांना कुटुंबीयांसह आपल्या राज्यात जाणे सोयीचे झाले.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. उपराजधानीत हजारो परप्रांतीय मजूर कामासाठी आलेले होते. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अशा बिकट परिस्थितीत या मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. शेकडो मजुरांचे लोंढे पायीच आपल्या गावाकडे निघाले. मजुरांची होत असलेली पायपीट पाहून महाराष्ट्र शासनाने मजुरांना सोडण्यासाठी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर विभागात घाट रोड, गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, रामटेक, सावनेर, काटोल आगारातून परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. या मजुरांना मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर सोडण्यात आले. तर बहुतांश मजुर जबलपूर आणि भंडारा मार्गावर रिंगरोडने पायी जात होते. या मजुरांना जबलपूर मार्गावरील पांजरी चेक पोस्ट आणि भंडारा मार्गावरील कापसी चेक पोस्टवर ‘आॅन द स्पॉट’ सेवा देण्यात आली. अनेक संघटनांनी या चेक पोस्टवर मोठमोठे तंबू उभारून तेथे या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या चेक पोस्टवर सफाईची व्यवस्था केली. १० ते १७ मे दरम्यान मध्य प्रदेशाच्या सीमेवर जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीने ४६१ बसेस सोडून १०२८६ मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविले. तर याच कालावधीत छत्तीसगडच्या सीमेवर ४२७ बसेसच्या माध्यमातून ९७३७ मजुरांना पोहोचविले. श्रंिमक स्पेशल रेल्वेगाड्यांनी आलेल्या ७४९ प्रवाशांसाठी ३४ बसेसची व्यवस्था करून त्यांना आपल्या गावी पोहोचविण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळआली होती. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी लाल परीने नि:शुल्क त्यांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवून प्रवाशांच्या सेवेसाठी हे आपले ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

प्रत्येक बसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन
मजुरांना सोडण्यासाठी एसटीच्या नागपूर विभागाने स्थानिक प्रशासन, पोलिसांनी दिलेल्या याद्यानुसार बसेस उपलब्ध करून दिल्या. बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार एका बसमध्ये केवळ २२ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली.

बसस्थानकाची स्वच्छता, बसेसचे निर्जंतुकीकरण
मजुरांना सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने बसेस सोडणे सुरु केल्यानंतर विभागातील सर्व बसस्थानकांचा संपूर्ण परिसर नियमितपणे स्वच्छ करण्यात आला. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासावरून आल्यानंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाशांना मास्क वापरून, शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून देण्यात आल्या.

स्वयंसेवी संस्थाच्या साहाय्याने भोजनाची व्यवस्था
आपापल्या राज्यात जाण्यासाठी बहुतांश मजूर बसस्थानकावर आल्यानंतर ते उपाशी असल्याची बाब एसटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांना संपर्क साधून बसस्थानकावरच या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

‘मजूर पायी जाऊ नयेत ही भूमिका’
‘लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांच्या सुविधेसाठी एसटी प्रशासनाने मोफत बसेस चालविण्याचा निर्णय घेऊन वाहतूक सुरु केली. परंतु क ाही मजूर शहराबाहेरील रिंग रोडने पायी जात होते. या मजुरांसाठी पांजरी आणि कापसी चेक पोस्टवर बसेस उपलब्ध करून दिल्यात. शासनाच्या निर्देशानुसार सर्व खबरदारी घेऊन बसेसची वाहतूक सुरु आहे. मजूर पायी जाऊ नयेत, ही या मागील भूमिका आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

 

Web Title: Red fairy running for laborers on foot; Arrangement of 922 buses from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.