ग्रीन बसच्या मार्गात आरटीओचा रेड सिग्नल

By admin | Published: September 30, 2015 06:31 AM2015-09-30T06:31:55+5:302015-09-30T06:31:55+5:30

महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवरील ग्रीन बसला शहरात चालविण्याची फेब्रुवारी २०१५ मध्ये परवानगी दिली

The red signal of the RTO on the green bus route | ग्रीन बसच्या मार्गात आरटीओचा रेड सिग्नल

ग्रीन बसच्या मार्गात आरटीओचा रेड सिग्नल

Next

नागपूर : महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवरील ग्रीन बसला शहरात चालविण्याची फेब्रुवारी २०१५ मध्ये परवानगी दिली होती. परंतु ही मुदत संपली असतानाही अद्याप वाढीव परवानगी नसल्याचे परिवहन विभागाचे (आरटीओ) म्हणणे आहे. विभागीय परिवहन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या परवानगीनंतरच बसला मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे विना परवानगी ग्रीन बस शहरात धावत असल्याची माहिती पुढे आली आहे.
महापालिका प्रशनासनाने स्कॅनिया कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर शहरातील मॉरिस कॉलेज ते खापरी नाका या दरम्यान सहा महिने ग्रीन बस चालविण्याला परवानगी दिली होती. हा करार १८ आॅगस्टला संपला आहे. त्यामुळे कराराला फेबु्रवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा व स्कॅनिया कंपनीत या बाबतचा करार करण्यात आला आहे. परंतु याबाबतची माहिती परिवहन विभागाला देण्यात आलेली नाही. मुदतवाढीबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. या संदर्भात कंपनीला कळविण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिका व कंपनी दरम्यानाचा सुरुवातीचा करार संपला आहे. परंतु मनपा व स्कॅनिया कंपनी यांच्यातील या कराराचा अवधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार मॉरिस कॉलेज ते खापरी दरम्यान एमएच ३१ डीएस-६३३७ या क्रमांकाची ग्रीन बस सुरू असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी दिली. मनपाने एक वर्षासाठी ही बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी परिवहन विभागाकडून अनुमती घेतली आहे. याची मुदत संपली आहे. सहा महिन्यापैकी केवळ १०२ दिवस ही बस शहरात चालविण्यात आली. प्रायोगिक अहवालाच्या आधारे या बसला देशभरात चालविण्यासाठी अनुमती दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The red signal of the RTO on the green bus route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.