नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:00 AM2019-05-23T00:00:17+5:302019-05-23T00:01:02+5:30

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले.

Redevelopment of Nagpur Central Railway Station soon | नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा मनपाला प्रस्ताव : महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा लूक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतचे सादरीकरण केले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, आयआरएसडीसीचे तज्ज्ञ वास्तूविशारद पी. एस. उत्तरवार, कार्य. महाव्यवस्थापक अश्विनी कुमार, उपमहाव्यवस्थापक (अर्बन डिझायनर) परोमिता रॉय, वास्तूविशारद आलिशा अकबर प्रामुख्याने उपस्थित होते.
अश्विनी कुमार व पी. एस. उत्तरवार यांनी प्रकल्पाची माहिती दिली. परोमिता रॉय आणि आलिशा अकबर यांनी स्थानकाच्या प्रस्तावित विकासाची माहिती दिली. त्यात सुविधा राहणार आहे. यासंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आधुनिक सुविधाने परिपूर्ण असे भारतातील क्लास वनचे स्थानक तयार होणार आहे.
जागतिक धर्तीवर नागपूर मध्यवर्ती स्थानकाच्या विकासाच्या योजनेला गती देण्याचे काम सुरू आहे. आयआरएसडीसीने देशभरातील निवडलेल्या ए-वन क्षेणीतील रेल्वे स्थानकामध्ये नागपूरचा समावेश केला आहे. बेल्जियमच्या टीमने नागपूर स्थानकाची पाहणी केली आहे. स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आयआरएसडीसीची यंत्रणा स्थानकांचा विकास करणार असल्याची माहिती पी. एस. उत्तरवार यांनी दिली.
नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना जागेच्या अभावाची समस्या जाणवत होती. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या बाजूची जागा, सेना भवन, मध्य प्रदेश परिवहन महामंडळ, मॉडेल स्कूलची जागा अधिग्रहित केली आहे. ही जागा अधिग्रहित करून नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे मॉडेल तयार केले आहे. या पुनर्विकासाच्या कामात नागपुरातील स्टेक होल्डरांना सहभागी होण्याचे आवाहन अश्विनी कुमार यांनी केले.
अभिजित बांगर म्हणाले, रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महापालिका सदैव आयआरएसडीसीच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारच्या कामाची आवश्यकता भासल्यास महापालिका रेल्वे प्रशासनासोबत असेल. यावेळी तेजींदरसिंग रेणू, हेमंत गांधी, अतुल पांडे, कैलाश जोगानी, कॅप्टन चंद्रमोहन रणधीर, हेमंत नानोटी यांच्यासह मनपाच्या नगर रचना विभागाचे अधिकारी व नागपुरातील स्टेक होल्डर प्रामुख्याने उपस्थित होते

 

Web Title: Redevelopment of Nagpur Central Railway Station soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.