यंत्रसामुग्रीची कमी, कशी होणार स्वच्छ नदी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:44 IST2019-05-07T23:43:36+5:302019-05-07T23:44:29+5:30
शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभियानात सहभागी विविध संस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र त्यांच्या पोक्लेन वा अन्य यंत्रसामुग्री नसल्याने खर्चाची तयारी दर्शविली. परंतु पोक्लेन उपलब्ध होत नसल्याने अभियानात यंत्रसामुग्रीची कमतरता निर्माण झाली आहे.

यंत्रसामुग्रीची कमी, कशी होणार स्वच्छ नदी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभियानात सहभागी विविध संस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र त्यांच्या पोक्लेन वा अन्य यंत्रसामुग्री नसल्याने खर्चाची तयारी दर्शविली. परंतु पोक्लेन उपलब्ध होत नसल्याने अभियानात यंत्रसामुग्रीची कमतरता निर्माण झाली आहे.
नागनदी स्वच्छतेच्या कामासाठी तीन पोक्लेन आहेत. तर पिवळी नदी व पोरा नदी स्वच्छतेच्या कामावर प्रत्येकी एक पोक्लेन आहे. यात लवकरच वाढ केली जाईल, अशी माहिती अभियानातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र पोक्लेन प्रामुख्याने मोठ्या कंत्राटदारांकडे आहेत. आपली कामे सोडून महापालिकेच्या नदी स्वच्छता अभियानाासाठी पोक्लेन उपलब्ध करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. यामुळे प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.
शहराच्या मध्यातून वाहणाºया नागनदीचे स्वच्छता अभियान २०१३ पासून राबवण्यात येत आहे. या नदीच्या किनाºयावर ३६ झोपडपट्ट्या आहेत. पावसाळ्यात तेथे पाणी शिरण्याचा धोका असल्याने नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. १८ किलोमीटर लांबीच्या नागनदीच्या पात्राचे विविध टप्प्यात विभाजन करून महापालिकेने स्वच्छता अभियान हाती घेतले.
यशवंत स्टेडियमजवळ रविवारी नागनदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.अंबाझरी ते पंचशील टॉकीज, पंचशील टॉकीज ते अशोक चौक, अशोक चौक ते केडीके महाविद्यालय, केडीके महाविद्यालय ते पिवळी नदी संगम असा नागनदी स्वच्छतेचा मार्ग आहे. पोरा नदी स्वच्छता अभियानाला सहकार नगर घाटापासून सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात पोरा नदीला पूर आल्यास या भागात पुराची पाणी शिरले होते. येथील नदीपात्र लहान असल्याने व पुढे नदी पात्रात गाळ व कचरा साचून असल्याने पुराचे पाणी तुंबले होते. त्यामुळे नदी स्वच्छता अभियान राबविताना संपूर्ण पात्रातील गाळ व कचरा काढण्यासोबतच गरज असेल त्या ठिकाणी खोलीकरण अपेक्षित आहे. मात्र पुरेशी यंत्रसामुग्री नसल्याने खोलीकरणाचे काम होताना दिसत नाही.
शहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झिक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असन त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख आहेत. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, झोन स्तरावरील आरोग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. झोनस्तरावर जबाबदारी विभाजित करण्यात आली आहे. नद्या स्वच्छता अभियानासाठी मनुष्यबळाची फारशी गरज नाही तर आवश्यकता यंत्रसामुग्रीची आहे.
पावसाळी नाल्या सफाईकडे दुर्लक्ष
मान्सूनपूर्व कामे दरवर्षी केली जातात. यात पावसाळी नाल्यांचाही समावेश असतो. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र जोराचा पाऊ स झाला की शहरात ठिकठिकाणी पाणी साचते. पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढला जात नसल्याने पाणी वस्त्यात शिरते. पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात गाळ व कचरा काढण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.