शिवशाही स्लीपरच्या भाड्यात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:01 PM2019-02-08T23:01:35+5:302019-02-08T23:03:05+5:30
एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात भरघोस कपात केली असून ही कपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानुसार नागपुरातून औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाने महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवासभाड्यात २३० ते ५०५ रुपये कपात करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीशी स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा यासाठी ही कपात करण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. नागपुरातून नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद आणि सोलापूरला वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान बसेस धावतात. त्यामुळे या शहरांना जाणाऱ्या प्रवाशांना या भाडे कपातीच्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
भाडे कपातीच्या निर्णयानंतर असे राहतील दर
पूर्वीचे भाडे नवीन भाडे
नागपूर-नांदेड १००५ ७५०
नागपूर-औरंगाबाद १३७० १०२५
नागपूर-हैदराबाद १३८५ १०३५
नागपूर-सोलापूर १६९० १२६०