ग्रामीण रुग्णालयात संदर्भसेवा शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:24 AM2021-02-20T04:24:01+5:302021-02-20T04:24:01+5:30
कळमेश्वर : राष्ट्रीय बाल आराेग्य कार्यक्रमांतर्गत कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भसेवा शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बालकांच्या आराेग्याची ...
कळमेश्वर : राष्ट्रीय बाल आराेग्य कार्यक्रमांतर्गत कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भसेवा शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बालकांच्या आराेग्याची तपासणी करून उपचार करण्यात आले तसेच पालकांना बालकांच्या विविध आजार, त्यावरील उपचार व त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
या तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डाॅ. प्रीती इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात हृदयरोग, डोळ्यांचे विकार, दंत विकार, रक्तक्षय इत्यादी आजारांचे निदान व त्यावर उपचार करण्यात आले. काहींना पुढील नि:शुल्क शस्त्रक्रिया करून देण्याचे नियोजन करून देण्यात आले, अशी माहिती पथक प्रमुख डॉ. दिलेश मेश्राम यांनी दिली. या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती गांजरे, डॉ. चौधरी, डॉ. रामटेके, डॉ. देशमुख, औषध निर्माण अधिकारी गव्हाणकर, मंजू कोल्हे, मेघा बारई, नेत्रचिकित्सक अधिकारी राम लांबट, प्रयोगशाळा अधिकारी देशपांडे यांनी सेवा प्रदान केली.