शरीरसंबंधानंतर लग्नास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:04+5:302021-07-14T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चार वर्षांपासून वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने प्रेयसीला झिडकारण्याचा प्रयत्न केला. लग्नास नकार देऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चार वर्षांपासून वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने प्रेयसीला झिडकारण्याचा प्रयत्न केला. लग्नास नकार देऊन तिला मारहाणही केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण घडले. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार तसेच धमकीचा गुन्हा दाखल केला. परवेज फिरोज खान (वय २६) असे आरोपीचे नाव आहे.
परवेज डोबीपुऱ्यात (मोमिनपुरा) राहतो. त्याचे २५वर्षीय तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिषही दाखवले होते. सप्टेंबर २०१७ पासून या दोघांनी सदरमधील मंगळवारी कॉम्प्लेक्स तसेच नई बस्ती परिसरात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. अलिकडे तो तिला टाळत होता. त्यामुळे तिने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. सोमवारी तिने परवेजची भेट घेऊन त्याला लग्नाबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने लग्नास नकार देऊन तिला मारहाण केली. ठार मारण्याचीही धमकी दिली. तरुणीने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच मारहाण करुन धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपी परवेजची चाैकशी सुरू आहे.
----