काळ्या तेलातील समोसा नकोच! पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 07:49 PM2022-06-06T19:49:39+5:302022-06-06T19:53:34+5:30

Nagpur News अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते, पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो.

Refuse to eat samosas fried in black oil! The recycled oil should be given to the bazo-diesel manufacturing company | काळ्या तेलातील समोसा नकोच! पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे

काळ्या तेलातील समोसा नकोच! पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे

googlenewsNext
ठळक मुद्देखाद्यतेलाचा वारंवार वापर गुन्हाचहोऊ शकतो कॅन्सर

नागपूर: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते, पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो.

वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असताना हॉटेलमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या तेलामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे काळ्या तेलातील समोसा नकोच! तेलाचा पुनर्वापर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे.

तेलातील टीपीसी २५ डिग्रीपेक्षा कमी असावा

उकळलेल्या तेलातील टोटल पोलर इंडेक्स (टीपीसी) हा २५ डिग्रीपेक्षा कमी असावा. २५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास तेल तळण्यासाठी वा खाण्यासाठी योग्य ठरत नाही. अशा तेलाचा पुनर्वापर न करता, बाझो-डिझेलची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकावे, असा अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियम आहे.

तेल किती वेळा वापरावे?

हॉटेलपेक्षा हातठेल्यावर खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे अनेक जण उघड्यावर समोसे, कचोरी आणि इतर पदार्थ आवडीने खातात. या ठिकाणी तेलाचा अनेकदा पुनर्वापर केला जातो. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार वापर केला जातो. उकळलेले तेल तळण्यासाठी दोन किंवा तीनदा वापरावे.

काळसर तेलात तळलेले पदार्थ हानिकारक

काळसर तेलातून तळलेल्या पदार्थांमुळे अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक असतो. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर कॅन्सर, ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पाच महिन्यांत २२ नमुने तपासले

अन्न व औषध प्रशासन विभागाने पाच महिन्यांत तेलाचे २२ नमुने घेतले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली आहे.

काळे तेल वापराल तर होईल दंड

शक्यतो हातठेल्यावर तळलेले पदार्थ लोकांनी टाळायला हवे. तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरतो. कारवाईदरम्यान अन्नसुरक्षा अधिकाऱ्याकडे टोटल पोलर इंडेक्स (टीपीसी) मोजण्याचे उपकरण असते. टीपीसी २५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास जागेवरच दंड आकारण्यात येतो.

तेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई

अन्न प्रशासन विभागाकडे नोंदणी हॉटेल व रेस्टॉरंटने, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये. अधिकाऱ्यांना त्रुटी आढळून आल्यास दंड, कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतात.

अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title: Refuse to eat samosas fried in black oil! The recycled oil should be given to the bazo-diesel manufacturing company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य