राज्यात हत्तींची संख्या कमी तरीही मागताहेत कॉरिडोरची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:17 AM2018-09-29T00:17:31+5:302018-09-29T00:19:22+5:30

महाराष्ट्रात कोल्हापूर-सावंतवाडी वनक्षेत्रात केवळ सहा हत्ती आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यातून स्थानांतरित होऊन महाराष्ट्राच्या सीमावर्ती सावंतवाडी परिसरात आल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत केंद्रीय वन मंत्रालय (हत्ती प्रकल्प)तर्फे राज्याच्या वन मुख्यालयाला हत्तीच्या कॉरिडोर (येण्याजाण्याचा मार्ग) ची माहिती मागितली जात आहे. सूत्रानुसार केंद्रीय मंत्रालयाने आपल्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात हत्ती कॉरिडोर नसल्याचा अहवाल जारी केलेला आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाने महाराष्ट्रात हत्ती कॉरीडोर नसल्याची माहिती केंद्राला पाठवली आहे. यानंतरही केंद्रीय मंत्रालयाद्वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हत्ती कॉरीडोरच्या माहितीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वन मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

Regardless of number of elephants in the state, corridor information is also sought | राज्यात हत्तींची संख्या कमी तरीही मागताहेत कॉरिडोरची माहिती

राज्यात हत्तींची संख्या कमी तरीही मागताहेत कॉरिडोरची माहिती

Next
ठळक मुद्देमाहिती देऊनही केंद्राची विचारपूस सुरूच : राज्यातील वनअधिकारी आश्चर्यचकित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात कोल्हापूर-सावंतवाडी वनक्षेत्रात केवळ सहा हत्ती आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यातून स्थानांतरित होऊन महाराष्ट्राच्या सीमावर्ती सावंतवाडी परिसरात आल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत केंद्रीय वन मंत्रालय (हत्ती प्रकल्प)तर्फे राज्याच्या वन मुख्यालयाला हत्तीच्या कॉरिडोर (येण्याजाण्याचा मार्ग) ची माहिती मागितली जात आहे.
सूत्रानुसार केंद्रीय मंत्रालयाने आपल्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात हत्ती कॉरिडोर नसल्याचा अहवाल जारी केलेला आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाने महाराष्ट्रात हत्ती कॉरीडोर नसल्याची माहिती केंद्राला पाठवली आहे. यानंतरही केंद्रीय मंत्रालयाद्वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हत्ती कॉरीडोरच्या माहितीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वन मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
वर्ष २००७ मध्ये राज्याच्या कर्नाटक सीमेला लागून असलेल्या सावंतवाडी क्षेत्रात सात हत्तींची संख्या नोेंदवण्यात आली होती. यानंतर ५ वर्षाने २०१२ मध्ये झालेल्या गणणेत केवळ ४ हत्तींची संख्या नोंदवण्यात आली. गेल्यावर्षी १६ ते १९ मे २०१७ दरम्यान झालेल्या प्रगणनेत कोल्हापूर वनक्षेत्रात एक आणि सावंतवाडीमध्ये सहा अशी एकूण सात हत्तींची संख्या नोंदवण्यात आली. परंतु केंद्रीय वन मंत्रालयाने नोंदीच्या पुराव्याच्या आधारावर केवळ सावंतवाडीमधील सहा हत्तींची उपस्थिती मान्य केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वन विभागाने हत्तीच्या कॉरिडोरची माहिती मागितल्याने वन अधिकारीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Web Title: Regardless of number of elephants in the state, corridor information is also sought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.