ई-पीक ॲपवर पिकांची नाेंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:33+5:302021-08-13T04:11:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : महसूल विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख पुणेअंतर्गत टाटा समूहाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : महसूल विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख पुणेअंतर्गत टाटा समूहाच्या सहकार्याने ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांनाे, माेबाईल ॲप ‘ई-पीक’वर पिकांची नाेंदणी करा, पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले.
नरखेड पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयाेजित ई-पीक पाहणी ॲप कार्यशाळेत त्यांनी संवाद साधला. यावेळी तहसीलदार डी. जी. जाधव, पं. स. सभापती नीलिमा रेवतकर, माजी कृषी सभापती सतीश शिंदे, पं. स. सदस्य मयूर उमरकर, सुभाष पाटील, माजी उपसभापती वैभव दळवी, सतीश रेवतकर, नायब तहसीलदार विजय डांगाेरे, भागवत पाटील उपस्थित हाेते.
यापूर्वी पीक पाहणी परंपरागत पद्धतीने हाेत असे. प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि शेतकऱ्यांची पाहणी यामध्ये तफावत निर्माण होत होती. परंतु आता शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी अॅपवर करणार. ही नोंदणी अचूक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकरी पिकांची माहिती व नोंदी, तलाठी तपासून घेतील. त्यामुळे पारदर्शकता येणार असल्याचे श्रीकांत उंबरकर यांनी यावेळी सांगितले. १५ आॅगस्टपासून या प्रकल्पाची सुरुवात होत असून, या अॅपद्वारे आपल्या शेतातील पीक पेरा शेतकऱ्यांनीच स्वतः भरून घ्यायचा आहे. हे अॅप मराठीमध्ये असून, वापरण्यास सोपे आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, सर्व शेतकऱ्यांनी यशस्वी करावा, असे आवाहन तहसीलदार डी. जी. जाधव यांनी यावेळी केले. कार्यशाळेला मंडळ अधिकारी विनय यावलकर, गुणवंता धवड, नीलेश मिश्रा, दयानंद कुमरे, मिलिंद चावले व शेतकरी उपस्थित हाेते.
120821\img_20210812_162520.jpg
ई अँप कार्यशाळेत माहिती देताना उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर व तहसीलदार डी जी जाधव