पिकांची ई-पीक अॅपवर नोंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:04+5:302021-08-13T04:13:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेखच्या मदतीने ई-पीक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेखच्या मदतीने ई-पीक पाहणी हे माेबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची या ॲपवर नाेंदणी करावी तसेच ई पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी कुही शहरात आयाेजित कार्यशाळेत केले.
नायब तहसीलदार उपेश अंबादे यांनी पीपीटीच्या माध्यमातून या ॲपची माहिती देत ते हाताळणे व त्यावर पिकांची नाेंदणी कशी करायची याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. यासाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते अधिकाधिक शेतकऱ्यांना याबाबत जागृत करणार तसेच शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांनी नाेंदणी या ॲपवर करवून घेणार असल्याचेही उपेश अंबादे यांनी सांगितले.
या अभियानाची १५ ऑगस्टपासून सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातील विविध पिकांच्या पेराक्षेत्राची माहिती या ॲपवर नाेंदवायची आहे. हे ॲप मराठीत असल्याने हाताळण्यास व समजण्यास साेपे आहे, शेतकऱ्यांनी हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन तहसीलदार बाबराव तीनघसे यांनी केले.
या कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे, रमेश पागोटे, मंडळ (महसूल) अधिकारी हिंदलाल उके, संजय तोटे, सुदेश मेश्राम, राजेंद्र शंबरकर, अनिल सहारे यांच्यासह कुही तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित हाेते.
...
नुकसानीचा अचूक अंदाज
दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ व अन्य नैसर्गिक कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आजवर परंपरागत पद्धतीने नुकसानीचे सर्वेक्षण केले जायचे. यात अचूकता येण्यासाठी या ॲपची मदत हाेणार आहे. यात शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांनी माहिती या ॲपवर नाेंदविणार आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील शेतमालाचेे उत्पादन, शेतीची प्रत यासह अन्य बाबींची माहिती अचूक मिळणार असून, तलाठी ती माहिती तपासून घेणार आहे, असेही तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी सांगितले.