कर्जमाफीसाठी ७९ हजार शेतकºयांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:06 AM2017-09-05T00:06:49+5:302017-09-05T00:07:31+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.
आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात शेतकºयांच्या बैठकी घेऊन आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज १५ सप्टेंबरपूर्वी भरून घ्यावेत, अशा सूचनाही दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या संबंधित तहसीलदाराकडे उपलब्ध करून द्याव्यात.
तहसीलदारांनी यातून गावनिहाय याद्या तयार कराव्यात. कुणी सुटत असतील तर त्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घ्यावेत. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाºयांनी घ्यावी. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांना योजनेची माहिती नाही अशा सर्व शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अविनाश कातडे, जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, लिड बँक मॅनेजर अयुब खान, तसेच सर्व तहसीलदार, बँकेचे व्यवस्थापक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावा
शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक बँकेच्या शाखेत शेतकरी कर्जदारांना माहिती देण्यासाठी तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या अधिकाºयांना केल्या.
टाळाटाळ करणाºया बँकावर नाराजी
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देण्यासाठी टाळाटाळ करणाºया बँकेबद्दल नाराजी व्यक्त करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचना देऊन सायंकाळपर्यंत तहसीलदारांकडे बँकनिहाय याद्या प्राप्त होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
१.६० लाख शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज बाकी
जिल्ह्यातील मंडळ तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ६२४ बायोमेट्रिक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसात ६७ हजार आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले असून आजपर्यंत ७९ हजार अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे १ लक्ष ६० हजार शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घ्यायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकºयांसाठी टोल फ्री क्रमांक
कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकरी सभासदांना आॅनलाईन अर्ज भरताना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७८८७४६३२९० हा स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरताना बॉयोमेट्रिक संदर्भात तसेच इतर कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाºयांचे काम चांगले, प्रभावी
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे शासनाच्या योजनांचे काम चांगले आणि प्रभावीपणे करीत आहेत. त्यांच्या कामावर सरकार समाधानी आहे, अशी पावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. पण तालुका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र सुस्त आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या प्रयत्नांवरच या योजनेचे यश अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जी झाली तर खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांनी सर्व अधिकाºयांना सांगितले.