नागपुरातील ३३ हजार अवैध नळांचे होणार नियमितीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:34 AM2019-05-15T00:34:52+5:302019-05-15T00:36:03+5:30

नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Regulation of 33,000 illegal tapes in Nagpur will be done | नागपुरातील ३३ हजार अवैध नळांचे होणार नियमितीकरण

नागपुरातील ३३ हजार अवैध नळांचे होणार नियमितीकरण

Next
ठळक मुद्दे२० मेपासून विशेष मोहीम : महापौर, आयुक्तांचे नियोजनाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. पाणीटंचाई व शहरात भविष्यात निर्माण होणारी भीषण टंचाई विचारात घेता महापौर आणि आयुक्तांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. यात २० मेपासून शहरातील अवैध नळ जोडण्या नियमित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कागदपत्रांच्या नियमातही शिथिलता आणण्यात आली आहे. दरम्यान, महापौर नंदा जिचकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली. नागपूर शहरातील पाणी टंचाईची शक्यता विचारात घेता यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोमवारी महापौरांनी आपल्या कक्षात बैठक घेतली. यात विविध निर्णय घेण्यात आले. अवैध नळांची संख्या मोठी आहे. कागदपत्रांच्या अटीमुळे ते नियमित करण्यात अडचणी येतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यावर सदर बैठकीत तोडगा काढण्यात आला. नागरिकांना आता केवळ एक शपथपत्र मनपाला द्यावे लागेल. सोबत आधार कार्ड आवश्यक असेल. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक बिल, निवडणूक ओळखपत्र, घर कर पावती यापैकी कुठलाही एक पुरावा द्यावा लागेल. ही विशेष मोहीम २० मेपासून राबविण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले. नागरिकांनी आपले अनियमित नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.
बिल वसुलीला फटका
शहरात मोठ्याप्रमाणात अवैध नळ जोडण्या असल्याने पाणी बिल वसुलीवर याचा परिणाम होतो. जोडण्या नियमित केल्यास जलप्रदाय विभागाच्या वसुलीत वाढ होईल, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त क रण्यात आली.
तर गुन्हा दाखल होईल
महापालिकेने अवैध नळ जोडणी नियमित करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन जोडणी नियमित करून घ्यावी. मनपाचे पथक सर्व झोनमध्ये घरोघरी पोहचणार आहे. मात्र, यानंतरही कुणाकडे कनेक्शन अनियमित आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

झोननिहाय अवैध नळ
लक्ष्मीनगर -१४९०
धरमपेठ - २६४०
हनुमाननगर -४२
धंतोली -२५५०
नेहरूनगर -९६७
गांधीबाग -२५०
सतरंजीपुरा -७५४१
लकडगंज-२९५०
आसीनगर -१२३०५
मंगळवारी-३१९०

 

Web Title: Regulation of 33,000 illegal tapes in Nagpur will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.