‘आयआरएस’ नाकारून पुन्हा केली कठोर मेहनत

By admin | Published: June 1, 2017 02:25 AM2017-06-01T02:25:32+5:302017-06-01T02:25:32+5:30

दहावी, बारावीला मी कधीच मेरिटमध्ये आलो नाही. तरीही मला लहानपणापासूनच आयएएसच व्हायचे होते.

Rejected the irs' hard work again | ‘आयआरएस’ नाकारून पुन्हा केली कठोर मेहनत

‘आयआरएस’ नाकारून पुन्हा केली कठोर मेहनत

Next

दहावी, बारावीला मी कधीच मेरिटमध्ये आलो नाही. तरीही मला लहानपणापासूनच आयएएसच व्हायचे होते. या जिद्दीच्या बळावरच यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या वेळी फार थोड्या वेळांनी संधी हुकली. दुसऱ्यांदा आयआरएससाठी निवडल्या गेलो. पण, ते माझे ध्येयच नव्हते. पुन्हा नव्याने परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी सिलेक्ट झालो. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण केले. अभ्यासासाठी कुणी घरी दबाव टाकला नाही परंतु मी माझे लक्ष्य कधी विसरलो नाही. दहावीला ८०.१४ टक्के गुण पडले. मेरिट आलो नाही म्हणून निराश झालो नाही. आणखी अभ्यास केला. बारावीला ८८.५० टक्के गुण मिळाले. इंजिनिअरिंग करतानासुद्धा पहिल्या टॉप टेनमध्ये कधीच आलो नाही. यूपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्या प्रयत्नात खूप कमी फरकाने संधी हुकली. वाईट वाटले परंतु निराश झालो नाही.आणखी जिद्दीने अभ्यास केला. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी निवडल्या गेलो. आज जिल्हाधिकारी आहे. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही गोष्टीने निराश होऊ नका. अपयश हा आयुष्याचा शेवट असूच शकत नाही. अपयशा पलीकडेही खूप काही आहे, हे विसरू नका.
सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी , नागपूर
 

Web Title: Rejected the irs' hard work again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.