Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:14 PM2022-01-07T20:14:18+5:302022-01-07T20:33:25+5:30
जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यस्थानी आहे
सुरभी शिरपूरकर
नागपूर - जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. दरम्यान, या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी संघटना चवताळल्या असल्याचं त्यांनी म्हटलं.
जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यस्थानी आहे. देशाचा झिरो माईल्स नागपुरात आहे. कोणत्याही दहशतवादी शक्तींना येथपर्यंत पोहोचणे तेवढे सोपे नाही. तरीही दहशतवादी येथपर्यंत पोहोचतातच कसे, हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. पण आज मिळालेल्या या माहितीनंतर नागपूर पोलिस सतर्क झाली असून संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंजाबच्या फिराजपूर येथे रस्त्यावरच थांबावे लागले होते. त्यांच्या सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा उघड झाल्याने भाजपा नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. आता, संघ कार्यालयाची रेकी झाल्याचे वृत्त येताच भाजप नेते तीव्र संताप व्यक्त करत आहेत.