नागपुरात नातेवाईकाने केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:58 PM2019-04-16T21:58:25+5:302019-04-16T21:59:12+5:30
झंडू बाम आणून देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत बोलवून एका आरोपीने महिलेवर (वय ३२) बलात्कार केला. ५ एप्रिलला दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने तब्बल १० दिवसानंतर गिट्टीखदान पोलिसांकडे नोंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झंडू बाम आणून देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत बोलवून एका आरोपीने महिलेवर (वय ३२) बलात्कार केला. ५ एप्रिलला दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने तब्बल १० दिवसानंतर गिट्टीखदान पोलिसांकडे नोंदविली.
पीडित महिलेचे कुटुंबीय मूळचे राजस्थानी आहे. रोजगाराच्या शोधात आलेली ही मंडळी सध्या गिट्टीखदानमध्ये राहते. महिलेचा पती फर्निचरचे काम करतो. तिला तीन मुलं आहेत. आरोपी महिलेचा भासरा (पतीचा चुलतभाऊ) आहे. तो सूरत(गुजरात)मध्ये राहतो. फर्निचरच्या कामाच्या निमित्ताने दोन आठवड्यापूर्वी तो नागपुरात आला होता. ५ एप्रिलला त्याला परत सूरतला जायचे होते. त्यामुळे महिलेच्या पतीने त्याला घरी जेवायला बोलविले. येथूनच त्याला रेल्वेस्थानकावर सोडून देण्याचे ठरले होते. सकाळी जेवण
आटोपल्यानंतर ११.३० च्या सुमारास महिलेच्या पतीला त्याचे काम सुरू असलेल्या कार्यालयातून फोन आला. त्यामुळे काही वेळेत परत येतो, असे सांगून महिलेचा पती घरून निघून गेला. महिलेची मुले घराबाहेर खेळत होती तर आरोपी आणि महिला घरात एकटीच होती. ती घरातील काम आवरत असताना आरोपीने तिला झंडू बाम मागितली. ती आणून देताच त्याने तिचा हात धरून तिला जवळ खेचले. महिला आरडाओरड करणार हे लक्षात आल्याने आरोपीने तिचे तोंड दाबले. एका हाताने दार लावून घेतले आणि महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला बदनामीचा धाक दाखवून गप्प राहण्यास सांगितले. काही वेळेनंतर महिलेचा पती घरी आला. त्यानंतर त्याच्यासोबत आरोपी रेल्वेस्थानकावर आणि तेथून सूरतला निघून गेला.
तातडीने पतीला सांगण्याचे टाळले
महिलेने पतीला तातडीने हा प्रकार सांगण्याचे टाळले. दोन ते तीन दिवसानंतर तिने नवऱ्याजवळ आपबिती सांगितली. त्यामुळे नवरा बिथरला. त्याने आपल्या सर्व नातेवाईकांना हा प्रकार सांगून आरोपीला फोन करून जाब विचारला. तब्बल १० दिवस झाल्यानंतर त्याने पत्नीला या घटनेची तक्रार नोंदविण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी तिने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी सूरतमध्ये असल्याने त्याला अद्याप अटक झालेली नाही.