उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:44 PM2019-07-09T23:44:48+5:302019-07-09T23:46:36+5:30

वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले.

Relax the conditions for the use of ashes by industries : Energy minister Orders | उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्र्यांचे आदेश

Next
ठळक मुद्देमहाजेम्सची आढावा बैठक

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले.
बिजलीनगर येथे महाजेम्सची आढावा बैठक ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतली. याप्रसंगी कोराडी व चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्र येथे राखेवर आधारित उद्योगांसाठ़ी क्लस्टर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्लस्टर निर्माण झाल्यानंतर त्यात देण्यात येणाऱ्या नागरी सुविधा लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या. या बैठकीत कोराडी व चंद्रपूर फ्लाय अ‍ॅशसंबंधी ठळक मुद्दे चर्चिले गेले. बैठकीदरम्यान महाजेम्सतर्फे कार्यकारी अभियंता किनाके यांनी कोराडी क्लस्टरबाबत सादरीकरणातून माहिती दिली. राखेवर आधारित उद्योगांद्वारे कोराडी येथील फ्लाय अ‍ॅशची उपयोगिता वाढणार आहे. यावेळी राख परिषदेचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालिवाल यांनी कोराडी येथील क्लस्टरमध्ये उद्योगांना लागणाऱ्या सुविधांबाबत सादरीकरण केले. तसेच चंद्रपूर येथील प्रस्तावित फ्लाय अ‍ॅश क्लस्टरच्या जागेसंबंधी महाजेम्सचे कार्यकारी अभियंता डी. वाय चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी क्लस्टरच्या विविध कामांना व पायाभूत सुविधा देण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. बैठकीला महाजेम्सचे संचालक कैलास चिरुटकर, मुख्य अभियंता राजेश पाटील,राजकुमार तासकर, राजू घुगे, उपमुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार शेखर अमीन, सुधीर पालीवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधी हेमा देशपांडे, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाव्यवस्थापक गजेंद्रभारती, उपस्थित होते. राख उद्योग उभारू इच्छिणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी गिरधारी मंत्री, आशिष वांधीले, शेखर जिचकार, राहुल नेमाडे, अनिल गोठी, चेतन कांबळे यावेळी उपस्थित होते.

Web Title: Relax the conditions for the use of ashes by industries : Energy minister Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.